Heart touching friendship quotes| Happy friendship day 2024 (मैत्री शायरी मराठी photo)
Heart touching friendship quotes
Heart touching friendship quotes : नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त एक मित्र पाहिजे..खरय आपल्या जीवनात जीवाभावाचे मित्र-मैत्रीण असतील तर सगळ काही सोप्प होऊन जात मग कोणत्याच नात्याची गरज पडत नाही. नातेवाईकांपेक्षा आपले मित्रच आपल्या कामी येतात. आपल्या जीवनात कोणतीही अडचण येउद्या,संकटे येउद्या सदैव आपल्या सोबत असणारे आपले मित्रच आपल्या सोबत उभे राहतात. आपल्या वाईट काळात आपल्या सोबत नेहमी असतात त्यामुळ आपण आपले मित्र-मैत्रीण जपले पाहिजे. वेळोवेळी आपल्या मदतीला धावून येतात.
आपल्या हक्काची जागा म्हणजे “मित्र”.आपल्या मनातल सुख-दुख आपन त्यांना सांगतो.कॉलेज मध्ये आपण मित्र बनवतो त्यांच्या सोबत फिरतो खूप गप्पा गोष्टी करतो त्यातच एक आनंद आहे.खरच , जिवलग मित्र असतील तर देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे ती आपल्याला.त्या मैत्रीच्या नात्याला जपून ठेवता आलं पाहिजे. असेच काही मैत्री वर आधारित Heart touching friendship quotes इथे दिले आहेत ते तुमी Download करू शकता आणि आपल्या मित्रांना पाठू शकता. असेच आपल्या आयुष्यात नवनवीन मित्र-मैत्रीण बनवा. Heart touching friendship quotes in marathi.
आयुष्यात एक तरी bestii अशी असावी कि
ती आपल्यासाठी 24 तास available असेल,
जेणेकरून मन हलके करता येईल..
मैत्रीत वयाच काहीच घेण -देण नसत,
जिथे विचार जुळतात ना तिथे आपोआप
मैत्री होते…
अनुभव सांगतो कि एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो…
मनातलं ओझं कमी करण्याच,
हक्काचं एकच ठिकाण म्हणजे
“मैत्री”…..
जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देत,
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री….!
चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते…
फक्त दोन मानस हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजू शकेल…!
मित्र किती आहेत हे महत्वाच नाही तर
वेळेला त्यातले किती जण
आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतात,
हे महत्वाच आहे…!
जीवनाची चौकट मोडून जे आपल्याला
जगायला शिकवतात ना त्यांनाच तर
जिवलग मित्र म्हणतात…!
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…!
सगळ्यात खतरनाक दुश्मन मित्रच असतात…
सागराचे पाणी कधी आटणार नाही
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…!
एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे,
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना
तू पुन्हा वर जाणं विसरशील…!
आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना..!
आपली मैत्री एक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडू हि शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल..!
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ
हळव्या मनाला आसवांची साथ
उधाण आनंदाला हास्याची साथ
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…!
Read more : Mothers day quotes in marathi
जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
आणि फक्त मैत्री..!
बंधना पलीकडे एक नाते असावे
शब्दांचे बंधन त्याला नसावे
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा
दुखाला तिथे थारा नसावा
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा..!
गुलाब उमलतो नाजूक काट्यावर
गावत झुलते वार्याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणुस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”..!
चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री…!
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत
जमीन मुळात ओली असावी लागते..!
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ती म्हणजे मैत्री असते..!
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी ,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एकवेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी..!
मैत्रीचे नाते असेही असते
जिथे भावनांचा आदर असतो
नितळ आणि निर्मळ प्रेमाशिवाय
अपेक्षांचा कधीच खेळ नसतो..!
खरच मैत्री असते पिंपळाच्या पानासारखी
त्याची कितीही जाळी झाली,
तरी ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटते …!
रक्ताचे नाते नसतानाही
मनात घर करणारे
मित्र म्हणून हक्काने योग्य मार्ग दाखवणारे
माझे जिवलग सखे -सोबती म्हणजे “मित्र”…!
ओलसर मातीवर पाण्याचे ठसे
हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे
दिवसा मागून दिवस जातात उरतात फक्त
न विसरू शकणारे मैत्रीचे किस्से…!
काळोख्याच्या वाटेवर चालताना हातामध्ये तुझाच हात,
धडपडत्या आयुष्याला सावरताना आता फक्त तुझीच साथ…!
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो,
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो…!
चंद्राला साथ चांदण्यांची
धरतीला साथ गगनाची,
अन मला लाभलेली साथ
तुमच्या सारख्या मित्रांची….!
जणू ओळख पवित्र नात्यांची…
मैत्री ही निखळ पाण्याचा झरा असते
आयुष्याच्या प्रवाहासोबत सदैव वाहते
आनंदात झुळझुळनाऱ्या पाण्यासारखी
शांत आणि निर्मल असते,
तर दुखात प्रलयाचा स्वरूप घेते…!
आपुलकीच्या नात्यात निसर्गाचा रंग
फुलाच्या सुगंधाप्रमाणे मैत्रीचा गंध,
फुलपाखराप्रमाणे स्वच्छंदी बागडण
सदैव लाभो मला तुझ्या मैत्रीचा छंद..!
आयुष्यात काही Friends असेही असतात
ज्यांच्यासोबत Friendship तुटण्याच्या विचाराने पण
आपल्याला भीती वाटते..!
तुझ्या मैत्रीची इतकीच खात्री असते
तुझी ओंजळभर सोबतच मला
आभाळभर वाटते..!
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून हि पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्या नात्यालाच
“मैत्री” म्हणतात..!
Friendship हे एक खूप चांगली रेसपोन्सिबिलीत्य आहे,
जे आपल्याला Tension नाही Happiness देते…!
मैत्री स्वच्छ दुपार, मैत्री संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी
मैत्री म्हणजे, भरलेलं आभाळ..!
मैत्रीचे नाते असेच असते
जिथे रक्ताचे संबंध नसते
ना जात ना धर्म असते
मना – मानाने गुंफलेले
रेशमी बंधन असते..!
उतरत्या वयाच्या सांजवेळीही एकू यावी अशी सुंदर तान,
आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकाला सुवर्णाक्षरांनी लिहावं असं पान,
म्हणजेच “मैत्री”…….!
लोकं रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो
लोकं स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो,
फरक एवढाच आहे कि लोकं जगात मित्र पाहतात
आणि आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो…!
आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळू द्या…
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत.
हे त्यांना कळू द्या…!
निसर्गाला रंग हवा असतो,
फुलांना गंध हवा असतो
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो…..!
मैत्री करत असाल तर, दिव्यातल्या पनती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल, हृदयात असं एक मंदिर करा…!
मैत्री म्हणजे एक विसावा
मैत्री म्हणजे एक सहारा,
आयुष्यरुपी खोल सागराचा
मैत्री म्हणजे एक हिरवा किनारा…!
अनेक जण प्रेमात वेडे आहेत,
आणि आम्ही मैत्रीत वेडे झालोय..!
चुका होतील आमच्या मैत्रीत पण
विश्वास घात कधीच होणार नाही..!
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते
ती फक्त मैत्री…!
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं,
शेवटी काय घेऊन जाणार आहोत,
म्हणून आयुष्यभर मैत्रीचं हे रोप असंच जपत राहावं..!
मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपले पण सवयी कधीच सुटत नाहीत…!
मैत्रीचा हटके अंदाज हवा, तुझ्या ह्रदयात आठवणींचा हळुवार कप्पा हवा,
तू फोन कर अथवा नको पण मला तुझा दररोज एक मेसेज तरी हवा..!
त्रास फक्त प्रेमात होतो असं नाही, एकदा जीवापाड मैत्री करून पाहा, प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो..!
आयुष्यात तुमचे मित्र आरसा आणि सावलीसारखे असावे
कारण आरसा कधी खोटं बोलत नाही,
आणि सावली कधी साथ सोडत नाही..!
मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ… जी मला मिळाली तुझ्या रूपात..!
मैत्री असावी मनामनाची, मैत्री असावी जन्मोजन्मींची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
मैत्री असावी तुझ्या आणि माझ्यासारखी..!
गर्दीत मित्र ओळखायला शिका नाहीतर, संकटाच्या वेळी मित्र गर्दी करणं विसरतील..!
मैत्रीचे नाचे तेव्हाच घट्ट असते, जेव्हा त्यांच्यासोबत बोलताना तुम्हाला विचार करावा लागत नाही..!
खरा मित्र कधीच तुम्हाला तुमच्या खऱ्या नावाने हाक मारत नाही..!
मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तुझ असत
कुठल्याही पारड्यात तिला तोळा,,
मैत्रीच पारड नेहमी जडच असत.
मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते
मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते
कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त मैत्रीच असते,
रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्रीच्या नात्यांमध्ये प्राण असतो
म्हणूनच कदाचित रक्ताची नाती मरतात पण,
मैत्रीची नाती सदैव टिकतात…!धन्यवाद..!