Nagpanchami | Nagpanchami wishes in marathi – नागपंचमी शुभेच्छा 2024

Nagpanchami

Nagpanchami

Nagpanchami : नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे या वर्षी 9 ऑगस्ट २०२४ ला नागपंचमी आहे. आज श्रावण शुध्द पंचमी म्हणजेच नागपंचमी. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी..”नागपंचमी.” नागपंचमीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान दिले जाते. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून गोड-धोड पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. तसेच महिला नटून- थटून वारुळाची पूजा करतात. आपल्या सुख-समृद्धी साठी नागदेवताची पूजा करतात. तसेच नागपंचमीच्या दिवशी शंकर शिवभोले या देवाची पूजा ही करतात. Nagpanchami 2024 date and time, Nagpanchami story,Nagpanchami in marathi.

नागपंचमीची पौराणिक कथा (Nagpanchami story) :

आटपाट नगरात एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक वारूळ होत. शुध्द श्रावणमास आला म्हणजेच नागपंचमी आली. शेतकरी नित्य नियमाने शेतात गेला व त्याने शेतात नांगर धरला. नांगरत असताना तिथे के नागांच नागकुळ होत व तो नांगर त्या नागकुळाला लागतो व त्यातली नागाची जी पिल्ले असतात ती मरण पावतात. थोड्याच वेळात तिथे नागीण येते व पाहते तिथे आपली पिल्ले मरण पावली आहेत ती आजूबाजूला पाहते तर शेतकऱ्याच्या नांगराला रक्त लागलेलं असत. ती आता त्या शेतकऱ्याचा बदला घेवू लागते.

नागीण शेतकऱ्याच्या घरी जाते त्याच्या मुलाबाळांना, लेकीसुनांना, बायकोला आणि शेतकऱ्याला दंश करते व ते मरण पावतात. पुढे तिला समजल की शेतकऱ्याची लेक परदेशी आहे तर ती तिकडेही जाते आणि पाहते तर शेतकऱ्याची लेक व्रत करत असते. नागाची पूजा करत असते. नागाची पूजा झाल्यावर दुधाचा नैवेद्य दाखवते. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दुध पिऊन समाधानी झाली, आनंदाने लोळली.

मुलीला म्हणाली बाई तू कोण आहेस, तुझे आई-वडील कुठे आहेत. इतके बोलून झाल्यावर तिने डोळे उघडले आणि समोर नागीण पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई घाबरू नकोस फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे दे. तिने सर्व हकीकत सांगितली, ते ऐकून नागीणीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही बाई आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आणि व्रत करते आणि आपण हिच्या बापाला दंश करण्याच मनात आणलं. नागीण सर्व हकीकत त्या बाईला सांगते.तिला खूप वाईट वाटत. बाई म्हणते आता त्यांना जिवंत करण्यासाठी काही उपाय सांगा.

नागिणीने तिला अमृत आणून दिले आणि ती त्याच पावली आपल्या बापाच्या घरी जाते. सर्वांच्या तोंडात अमृत घालते आणि सर्व मंडळी जिवंत झाली. सर्वांना फार आनंद झाला होता. तिने आपल्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली. वडिलांनी विचारल हे व्रत तू कस केलं? मुलीने व्रताचा संपूर्ण विधी सांगितला आणि शेवटी हे ही सांगितलं की , इतक काही केल नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. व्रत करू लागला.

जशी नागीण त्या मुलीला आणि शेतकऱ्याला प्रसन्न झाली तसेच तुम्हा-आम्हा होवो हीच इच्छा. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..

Nagpanchami wishes in marathi

Nagpanchami
Nagpanchami

श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी,,
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून
भगवान श्री कृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे
श्रावण शुक्ल पंचमी..नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…..

Nagpanchami

देवतांचे देवता महादेव,
भगवान विष्णूंचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले
त्या सर्प देवाला माझा नमस्कार.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Nagpanchami

वसंत ऋतुच्या आगमनाने,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या मंगलदिनी
सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Nagpanchami

मान ठेऊया नाग राजाचा,
पूजा करून शिवशंकर भोले देवाचा…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Read More : Good morning motivational quotes in marathi

Nagpanchami

बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

दूध लाह्या वाहू नागोबाला,
चल ग सखे वारुळाला,
नागोबाला पुजायला…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवान शिव शंकर सर्वांना
शक्ती आणि सामर्थ्य देवो,
आपणास आणि आपल्या
परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा..

शिव शक्तीने, शिव भक्तीने आज
नाग पंचमीच्या शुभ प्रसंगी जीवनात
तुम्हाला प्रगती मिळो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात
यश आणि आरोग्य प्राप्त करो,,
आजचा दिवस शिवाला अर्पण करा
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

मान ठेवूया नाग राजाचा,
रक्षण करूया नागाचे,
जतन करूया आपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर
ईश्वराची सदा कृपा असु दे,
आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो
नागपंचमी निमित्त आपणास आणि
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..

Treading

More Posts