Long Ukhane In Marathi For Female | 50+लग्न समारंभासाठी खास मोठे आणि लांब लचक उखाणे
Long Ukhane In Marathi For Female
Long Ukhane In Marathi For Female: नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला खास मोठे लांब लचक उखाणे सांगितले आहेत. हे (Long Ukhane In Marathi For Female) उखाणे तुम्ही लग्नात किंवा इतर कोणत्याही समारंभात घेऊ शकता. पूर्वी जुन्या काळातल्या बाया असेच मोठे लांब लचक उखाणे घेत असत. आणि या स्थितीला असे( Long Ukhane In Marathi For Female) लांब आणि मोठे-मोठे उखाणे खूप आवडीने आणि उत्साहाने नवी नवरी घेत आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे उखाणे खूप आवडतील.
सुखी संसाराची मनामध्ये घेऊन आस,
किशोर रावांसोबत नव्या जीवनाची करते सुरुवात,
वेळेचे भान राखून कर आता घाई,
किशोर रावांचे नाव घेते, आत येऊ का सासुबाई!
हळदी कुंकू लेते सुहासिनीच्या मेळ्यात,
गुलाबाचे फुल माळ्याच्या मळ्यात,
नऊ तोळ्याचा हार आत्या बाईच्या गळ्यात,
आत्याबाईच्या पोटचे, भाऊजीच्या पाटचे,
मुख्यमंत्र्यांचे मित्र, किशोर रावांच्या
जीवावर लेते मनी मंगळसूत्र!
सासू-सासर्यांची सून, वहिनी मी दिर नणंदेची,
जाऊ बाईंचा स्वभाव आठवण येते बहिणीची,
सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते,
मला खुश ठेवायला, किशोर रावांना छान जमते!
अधिक वाचा : रुखवत फराळ उखाणे मराठीमध्ये
सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण
द्रोणात तूप, तुपासारख रूप,
रूपा सारखा जोडा, चंद्रभागेला पडला विडा
चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं आणि
किशोर रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं!
सरसर जात होते, माडीवर पहात होते,
खिडकी लागली मानेला, रुपये दिले पानाला
केशर, चुना व कात लवंगा मुठीत,
वेलदोडे ओटीत, किशोरराव बसले दाटीत
कशी जाऊ पानसुपारी वाटीत!
आग्रह केला तुम्ही म्हणून घेते खास नाव,
सासू आहे माझी दुसरी माऊली,
वाटते मला सुखाची सावली,
सासऱ्यांचा आहे खूपच रुबाब,
देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब,
जे असतात नेहमी हसरे, संपतराव माझे सासरे
येऊ देत नाही माझ्या डोळ्यात आसू,
कमल माझी सासू,
मैत्रिणीसारखी आहे माझे ननंद
नाव त्यांचे घेताना होतो मला खूप आनंद,
बहिणीसारखी आहे माझी जाऊ,
सुवर्णा ताई आपण दोघी खूप सुखाने राहू
मागणं मागते पाहून श्रीकृष्णाची मूर्ती,
वाढत राहो माझ्या सासरची सुख-समृद्धी आणि कीर्ती
किशोर रावांचा आणि माझा लाखात एक जोडा,
आता तरी तुम्ही आमची वाट सोडा!
निळ्या-निळ्या आकाशात चमचमणारे तारे,
नाव घेते प्राची लक्ष द्या सारे,
नाव घ्या नाव घ्या नाव घ्यायचं,
नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं,
साध्या वरणभातावर साजूक तूप घालायचं,
सुषमा आईंना आता सासूबाई म्हणायचं,
छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची
बहीण आता नणंद बाईचा तोरा गाजवणार,
बबनरावांच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करणार,
नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं,
नवरोबाला शेवटी अहोत म्हणायचं,
साध्या वरण-भात साजूक तूप घालायचं,
रोहित रावांचं नाव घेत पवारांच्या घरात इंटर व्हायचं!
जुन्नर तालुक्यात माझं येणेरे गाव,
गावात होती माडी, माडीवर नेसते साडी.
साडीला लावला चाप,अनिल माझा बाप.
दारात होती जाई, निर्मला माझी आई.
पाण्याला गेली गवळण, सुनिता माझी मावळण.
पाण्यात होती नाव, बंटी माझा भाव.
समुद्राच्या पाण्यात झळकतात मणी,
शंकरराव माझे पती,
मी झाली त्यांची सौभाग्यवती!
नाव घेते नाव, सासर हेच आता माझं गाव,
गावात बांधला बंगला, बंगल्याला लावला चुना,
चुण्यावर नेसली साडी, साडीला लावला चहा.
ज्ञानेश्वर राऊत माझे बाप,
दारात होती जाई, अलकाबाई माझी आई.
ताटात होता खाऊ, योगेश माझा भाऊ.
कपाटात ठेवली चैन, भावना माझी बहीण.
पाण्याला चालली गवळण, लताबाई माझी मावळण.
हातात होती अंगठी, त्यावर चंद्राची खूण,
प्रवीण रावांचं नाव घेते, पवारांची मी सून!
नाकात नथ, पायात जोडवी,
पैठणी नेसले लक्ष्मी सारखी.
कानात कुड्या, हातात पाटल्या,
बांगड्यांमध्येच किणकिणती
वेणीत खोपा, नऊवारी साडी,
कपाळी चंद्रकोर कोरलेली.
भांगात कुंकू, हातात तोडे,
गळ्यात चंद्रहार मनी शोभतो
साक्षात लक्ष्मीच जणू उतरली,
लक्ष्मीचं स्वागत करीत आहे.
लक्ष्मी आणि नारायणाचं नाव घेऊन,
श्रद्धेने लक्ष्मीपूजन करते!
हंड्यावर हंडे ठेवले सात,
पाण्याला जाताना शिजत घातला भात.
पाणी शेकता तोल गेला,
काय सांगू तुम्हाला धनी न हात दिला,
माहेरची आठवण, डोळे डबडबले,
खरं सांगते तुम्हाला धनी न डोळे पुसले.
सुंदर कर्तृत्ववांधणीचा, मला वाटतो अभिमान,
रामकृष्ण रावांनी दिलं सौभाग्याचं दान!
काळी डिचकी कंगोऱ्याची, आत भाजी लिंबोळ्याची.
इन मोठी टकोऱ्याची, कुंकू लेती बारदानी.
बारदानीचा आरसा, आरशामागे परसा.
परसात होती केळ, केळीला आल्या तीन कळ्या
तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस,
तुळशीची करते सेवा,लक्ष्मणरावांचा आणि माझा –
जोडा जन्माला जावा!