Marathi Ukhane for female ([100+]मराठी उखाणे नवरी साठी)|Marathi ukhane

Marathi Ukhane for female

Marathi Ukhane for female

Marathi ukhane for female : महाराष्ट्राची परंपरा म्हणजे नाव घे बाई नाव घे ……लग्न असो, पूजा असो नाव तर हमखास घ्यायला आग्रह केला जातो. कधी – कधी ऐन वेळेस आपल्याला उखाणा आठवत नाही मग आपण गुगल ला शोधतो. तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आले आहात. इथे तुम्हाला Marathi ukhane for female तसेच marathi ukhane for male ,marathi ukhane पहायला मिळतील.

marathi suvichar for female
Marathi Ukhane for female

अधिक वाचा : मराठी उखाणे

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
____रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
गळ्यात मंगळसूत्र,हि सौभाग्याची खून,
____रावांचे नाव घेते____ची सून.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात____आणि____ची जोडी आहे जबरदस्त.

Marathi Ukhane for female
Marathi Ukhane for female

देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी,
____________ रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी.

खुश ठेवा मला, नको माणिकमोती,
__________ राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.

हिरवा चाफा, कमळ निळे,
________ मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.

Marathi Ukhane for female
Marathi Ukhane for female

आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे,
____________ रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.

स्वप्नात पहिले जे, ते रूप हेच होते,
_______________ रावांचे नाव आज, सर्वांसमोर घेते.

उंच मनोरे, नव्या जगाचे,
______________ रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.

Marathi Ukhane for female
Marathi Ukhane for female

दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन,
__________ रावांचे नाव घेऊन करते, तुम्हा सर्वांना वंदन.

शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
______________ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.

स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ,
_____________ रावांचे कष्ट मी, जाऊ देणार नाही व्यर्थ.

Marathi Ukhane for female

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
______ रावांच्या मांडीवर ______ घेते झोप.

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
___रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
___रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.

Marathi Ukhane for female
Marathi Ukhane for female

लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ,
________ रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ.

चालली सप्तपदीचे, सात पावले,
_______ रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

श्लोक रामदासांचे, आहेत किती छान,
______ रावांच्या संसारात, हरवले मी भान.

Marathi Ukhane for female
Marathi Ukhane for female

कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण,
______ रावांची आणि माझे, जुळले, ३६ गुण.

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी,_______
रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल, _________
दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.

Marathi Ukhane for female
Marathi Ukhane for female

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन________
रावांचे नाव घेते ________सून .

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 

बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले. 

Marathi Ukhane for female

आंबे वनात, कोकिळा गाते गोड,
________ रावांचे नाव घेते, वैनी वाट माझी सोड.

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
___रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.

Marathi Ukhane for female

गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
_________ रावांचे नाव घेते ______ ची सून.

गुलाबाचे फुल, गणपती बाप्पाला वाहिले,
_____________ च्या साठी, गाव पाहिले.

मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्लाची मूर्ती,
________ रावांची होवो, सगळीकडे कीर्ती.

Marathi Ukhane for female

चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप,
__________ रावांसाठी केले, ५ वर्ष तप.

 आषाढी कार्तिकी, पंढरपूरची वारी,
________ च नाव घेते, राम कृष्ण हरी.

प्रेम काय आहे, हे माहित नव्हते मला,
ते खूप सुंदर आहे, हे _______ रावांमुळे कळले मला.

Marathi Ukhane for female

आयुष्यात सु:ख-दुःख, दोन्ही असावे,
______ रावांचे प्रेम, माझ्यावर सदैव असावे.

वडिलांची छाया, आईची माया,
_________ रावांच्या सुखासाठी, झिजवते काया.

सोन्याच्या बेसरीत, पाचूचा खडा,
______ राव अन माझा, ७ जन्माचा जोडा.

Marathi Ukhane for female

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. 

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 

परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन. 

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. 

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा,
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. 

आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
…..याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर. 

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध,
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..

Marathi ukhane for male ( मराठी उखाणे नवरदेवासाठी )

Marathi ukhane for female

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
_______माझी नेहमी घरकामात दंग …

गाडीत – गाडी डेक्कन क़ीन ,
______माझी बुटी क़ीन…

एक दिवा दोन वाती ,
______माझी जीवनसाथी….

Marathi ukhane for male

सुंदर प्रेमाचे सुंदर गाव ,
________च्या मेहंदित माझे नाव….

काळी माती हिरवे रान ,
________चे माझ्या हृदयात स्थान…

खेळायला आवडतो मला PUBG गेम ,
_______वर आहे माझे खूप प्रेम…..

Marathi ukhane for male

कधीही फोन केलात तरी , लाईन लागते व्यस्त,
_______प्रेमात मी बुडालोय जबरदस्त…..

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
माझी आणि सौ….ची अखंड राहो प्रीती….

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने….

Marathi ukhane for male

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
…..च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात….

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ,
….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ……

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
…..चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खु
ले…..

Thank You!

Treading

More Posts