Motivational Quotes In Marathi | 250+Life प्रेरणादायक motivational quotes in marathi

Motivational Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi : नमस्कार मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर Motivation ची गरज असतेच. त्यापासून माणसाला आपली नवीन लाईफ सुरु करण्यास बळ मिळत आणि तो नव्याने कामाला लागतो. त्यापासून त्याला सकारात्मक प्रेरणा मिळत असते. आणि खर तर आज आपण पाहिलं तर Motivational Quotes In Marathi ची प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात आवशक्यता भासत आहे, depress व्हायला लागला आहे त्यामुळे आपण असेच नवनवीन प्रेरणादायी Motivational Quotes (Message, whatsapp, text) द्वारे पाठवून त्यांना प्रेरित करूया..!

तसेच तुम्ही (Motivational quotes in marathi for success, Positive thinking motivational quotes in marathi, Emotional motivational quotes in marathi, Self motivation positive motivational quotes in marathi) इथून Download करू शकता.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

कधी-कधी खूप काही बोलण्यापेक्षा,
गप्प राहिलेलं कधीही चांगल..

स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता,
स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही.

यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

प्रयत्न करताना चुका होतातच,
चुकांमधून येतो तो अनुभव आणि
अनुभवातून मिळते ते यश.

Read More : Birthday wishes for brother

अपमानाचा बदला भांडण करुन नव्हे,
तर समोरच्या व्यक्ती पेक्षा जास्त
यशस्वी होऊन घेतला जातो.

आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही…
त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका

जळायला काहीच नसले की पेटलेली,
काडी सुध्दा आपोआपच विझते.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी,
होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या
भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका,
त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा.

Motivational quotes in marathi for success | प्रेरणादायी मराठी सुविचार

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

जेव्हा सगळंच संपून गेलय
असं आपल्याला वाटतं तीच
खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरू करण्याची….

नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा,
स्वतःवर विश्वास ठेवा आणि
परिश्रम करण्याची तयारी ठेवा,

आपले लक्ष विसरू नका अन्यथा,
जे काही मिळाले आहे तेवढ्यावरच
संतुष्ट राहण्याची सवय लागेल..

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला,
खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा
खालच्या पायरीवर असतात..

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर,
आपल्या दृढनिश्चयावर अवलंबून असते.

पराभवाची भीती बाळगू नका,
एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव
पुसून टाकू शकतो.

काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू आहे,
म्हणूनच सध्या आम्ही मैफिलीत दिसत नाही.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही.

ज्यांनी तुमची धडपड पहिली आहे,
फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी
किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही
फक्त नशीबवान असता.

जसे चांगले दिवस राहत नाहीत,
तसेच वाईट दिवसही राहणार नाही.

Positive thinking motivational quotes in marathi

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

माणसाची वागणूक बघुन समजत की,
त्यांच्या जीवनात आपली किमंत काय आहे ते..
बरोबर ना…

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही कारण
मी अजून जिंकलेलो नाही…

प्रयत्न करीत रहा कारण,
सुरवात नेहमी कठीणच असते.

जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना,
तेवढं ताकदवान राहाल, अजिबात
कोणाच्या भरवशावर बसू नका,
स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि
स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभ करा..

खरं समोर आल्यावर सुध्दा जो
माणूस खोट्या वर खोटं बोलतो,
तो माणूस कधीही सुधरू शकत नाही
आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही..

जेंव्हा समजून घेणार कोणीच नसत ना तेव्हा,
शब्द कमी आणि अश्रूच जास्त बाहेर येतात.

आरश्याची किमंत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल,
पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर
शंभर रुपयांचा आरसाच लागतो.

एक सफरचंद काय पडल…
लगेच गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला,
इथे माणूस रोज पडतोय,पण माणुसकीचा
शोध अजून लागला नाहीये..

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचय
तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे,
व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख सांगतील..

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते..

संयम बाळगा काही वेळा सर्वात,
चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी
सर्वात वाईट परिस्थिती मधून जावे लागते..

विचार करुनही फायदा होत नसेल,
तर खरच विचार करायला हवा…

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही…

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल,
असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो

स्वतःच माइनस पॉइंट ओळखून घेणं,
हेच जीवनातलं सर्वात मोठं प्लस पॉइंट आहे..

वेळ ही बोलून दाखवत नाही,
कर करून दाखवते..

चांगल्या दिवसांची किंमत वाईट,
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही…

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला
विचार सुरू करतील..

सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे,
कारण या मार्गावर गर्दी कमी असते..

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचं ही तसच आहे काही काळासाठीच दुःख राहत
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी..

काय चुकल हे शोधायला हवं,
पण मात्र कुणाचं चुकल हेच शोधत राहतो..

बोलून विचार करण्यापेक्षा,
बोलण्याआधी विचार केलेला बरा..

काम संपले की प्रत्येक,
जवळीक अनोळखी होऊन जाते..

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचं असेल तर
चाली रचत रहाव्या लागतात..

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी…

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते..

या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे
आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरले आहे,
तुम्ही कितीही म्हणल की मी समोरच्याला पूर्णपणे
ओळखले आहे पण तस कधीच नसत..

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची,
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते..

न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न
करण्यांसमोर कधी-कधी नशीब सुध्दा हरत.

जिथे जहाजांनी सुध्दा जिद्द पकडलेली असते,
तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात…

यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा
अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना,
नशिबाला दोष देत नाहीत, ते स्वतः
प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात…

नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
तुम्ही फक्त मालक व्हायची स्वप्न बघा..

आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी,
पैशाने विकत घेतलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने
मिळवलेली लोकं सर्वात जास्त मोलाची
आणि सुख देणारी असतात..

तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल,
तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट
जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा….

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे…

Emotional motivational quotes in marathi

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

कासवाच्या गतीने का होईना पण
रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे बस
त्यांना हरवायची हिंमत ठेवा…

बोलणारा सहज बोलून जातो,
पण त्याला कुठे माहीत असते
एकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो…

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
की जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हरल तर असे हरा की जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे…

संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो,
बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुध्दा ओळख दाखवतात..

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही..

पैज लावायची असेल तर स्वतः सोबतच लावा,
कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल…

काही नाती अशी असतात की ज्यांना
जोडता-जोडता माणूस स्वतः मोडून जातो…

धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असत,
एक एक पाऊल टाकत चला रस्ता
आपोआप मोकळा होत जाईल…

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला
पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

संकटावर नेहमी चालून जा कारण,
ज्या भीतीचा आपण सामना करत नाही
ती आपली मर्यादा होऊन जाते…

स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा
की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी,
स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच
विचार करता आला पाहिजे….

माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करीन,
पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर तरच मी येईल…

लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठून, कधी येईल
सांगता येत नाही…

आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार,
जे लोक करू शकतात, शेवटी तेच लोकं जग बदलतात..

अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते,
ती म्हणजे हिमतीने हारा, पण कधी हिंमत हारू नका…

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..

आयुष्य कठीण आहे पण तक्रार करून,
ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत रहा….

आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका,
नाहीतर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतील.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात,
तर त्यात तुमची काही चूक नाही मात्र जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात तुमची चूक आहे.

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा,
की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला
वेळच नाही मिळाला पाहिजे..

खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते,
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी
शिकण्याची संधी असते…

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेलातेच पोहू
शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात,
ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते…

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो
आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो…

समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी
अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो..

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही
हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा,
अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या
हाताची ओंजळ रिकामी करत असते..

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

रोज सकाळी उठल्यानंतर
तुमच्याकडे दोन पर्याय असतात,
स्वप्न बघत परत झोपा नाहीतर
त्या स्वप्नांच्या मागे लागा…

जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त
संघर्ष करावा लागत असेल तर,
स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव त्यांनाच आयुष्यात
संघर्ष करायची संधी देतो,
ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे..

जर कोणी तुमचं मन तोडलं,
तर निराश होऊ नका कारण
हा निसर्गाचा नियमच आहे,
ज्या झाडावर गोड फळ असतात
त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात..

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर,
सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा..

वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी
न होणं हीच यशाची पायरी आहे..

तुमचं यश यावरून ठरवा की,
तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे..

आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं,
यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे
प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे…

प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य,
बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे..

लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे
निराश होऊ नका, दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.

यश ही तुमची सावली आहे
तिला पकडायचा प्रयत्न करू नका,
तुमचा मार्ग चालत राहा ते
आपोआप तुमच्यामागे येईल,
लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते
जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता..

Treading

More Posts