Tukaram maharaj abhang| 50+जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गोड अभंग

Tukaram maharaj abhang

Tukaram maharaj abhang

Tukaram maharaj abhang: नमस्कार मित्रांनो, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गोड अभंग या पोस्ट मध्ये दिलेले आहेत. संत तुकाराम महाराजांचे गोड अभंग तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र-परिवाराला पाठवू शकता.

याचसाठी केला होता अट्टाहास,
अंतरीचा दिस गोड व्हावा.
-श्री संत तुकाराम महाराज

ठेविले अनंते तैसेची राहावे,
चित्ती असुद्या समाधान
-श्री संत तुकाराम महाराज

असाध्य ते साध्य करिता सायास,
कारण अभ्यास तुका म्हणे
-श्री संत तुकाराम महाराज

जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
-श्री संत तुकाराम महाराज

आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा
आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी
आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे
रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला
-श्री संत तुकाराम महाराज

टिळा टोपी घालुनी माळा, म्हणती आम्ही साधू
दया,धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू
कलियुगी घरोघरी संत झाले फार
वितीभरी पोटासाठी हिंडती दारोदार
-श्री संत तुकाराम महाराज

सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे
धरी धरी आठवण मानी संताचे वचन
नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जराव्याधे
तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मूढा
-श्री संत तुकाराम महाराज

धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती
मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा
करिसी अंगिकार तरी काय माझा भार
जिवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा
-श्री संत तुकाराम महाराज

शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी
सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ
तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती
-श्री संत तुकाराम महाराज

अवगुणांचे हाती आहे अवघीच फजीती
नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड
विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी
तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव
-श्री संत तुकाराम महाराज

अधिक वाचा : Congratulation wishes for success

सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती
रखुमाईच्या पती सोयरीया
गोड तुझे रूप गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळ
विठु माऊलीये हाची वर देई
संचारोनी राही हृदया माझी
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
-श्री संत तुकाराम महाराज

आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया
भाग गेला सीण गेला अवघा झाला आनंद
प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी
तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठला घोगे खरे माप
-श्री संत तुकाराम महाराज

घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापुर्वी
शब्द हेची का शब्द सुईदोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे
बोलावे मोजके नेमके, खमंग, खमके ठेवावे भान
देश, काळ, पात्राचे बोलावे खरे बोलावे खरे
-श्री संत तुकाराम महाराज

जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Click Here

Treading

More Posts