Chavat ukhane in marathi |500+chavat ukhane (उखाणे मराठी कॉमेडी female)

Chavat ukhane in marathi

Chavat ukhane in marathi

Chavat ukhane in marathi : नमस्कार मित्रांनो, लग्न समारंभ म्हंटल की, उखाणे आलेच. कोणी सुंदर उखाणे घेत तर कोणी कॉमेडी उखाणे घेतात. उखाणे ऐकायला बाकी मंडळी बसलेलीच असतात. तुमचंही लग्न जमलं असेल तर इकडे तिकडे न शोधता तुम्ही इथून comedy/ funny marathi ukhane पाहू शकता. तसेच, chavat ukhane (chavat ukhane in marathi,Chavat ukhane in marathi for female,उखाणे मराठी कॉमेडी female) तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता.

1.MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा …लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा

2.कॉलेज ला येती सुटा बुटात …घरी झोपतो गोणपाटात

3.पांढरे पांढरे बदक त्याचे फेगडे फेगडे पाय ….. हे अजुन घरी नाही आले पिऊन पडले की काय

4.तु हसतेस छान, तु दिसतेस छान,यावर एकच उपाय, शुभ मंगल सावधान

5.चंद्र वाढतो कलेकलेने चंद्र वाढतो कलेकले ने…आणि वाढते किलो किलो ने

Read More : Dohale ukhane for male

Chavat ukhane for male – विनोदी उखाणे पुरुषांसाठी

1.खोक्यात खोका TV चा खोका…खोक्यात खोका टीव्ही चा खोका …मी तुझी मांजर … तु माझा बोका

2.महादेवाच्या पिंडीला नगोबाचा वेढा, तु माझी म्हैस अन् मी तुझा रेडा

3.साखरेचे पोते सुई ने उसवले, ….ने मला पावडर लाऊन फसवले

4.बघते यांच्याकडे आवडतो मला यांचा फ्रेंच कट…..रावांना जवळ कोणती पण पोरगी येते मी तिला म्हणते चल हट

5.इरण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव….रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव

Chavat ukhane for female – उखाणे मराठी कॉमेडी female

1.स्नेहल कडे बघता-बघता पडलो तिच्या प्रेमात, रस्त्यात चालता चालता सटकलो मी शेणात

2.उन्हाळ्यात असता मुंबईत फारच ऊन….. रावांच नाव घेते झाली मी कपूरांची सून

3.खायला आवडतो मला मुळापासून ऊस ..अग …साडी जरा वर घे बेंबी नको दाखवूस

4.कपाळी लावला टिळा, गळ्यात घातल्या माळा, आणि येता जाता ….नुसती मलाच मारती डोळा

5.माझ्या हातात सूर्यफुल, त्यांच्या हातात गुलाब …रावांना सात फेऱ्या मारताना त्यांना झाले जुलाब

Read More : Instagram Id names for girls

Marathi chavat ukhane

1.प्रेमाने भरवते मी, कोंबडी वाड्याचा घास, …..रावांना आहे मूळव्याधाचा त्रास

2.चांदीच्या ताटाला चंदनाच्या वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा

3.बिझनेस झाला,गेल्यावर्षी तोटा, तरीपण ….रावांनी उडवल्या लग्नात 100 च्या नोटा

4.पप्पी नाही दिली म्हणून बसले मी रुसून…..रावांच नाव घेते नाकातला शेंबुड पुसून

5.इवले इवले हिण, त्याचे इवले इवले पाय, …..राव आले नाहीत अजुन, पिऊन पडले की काय

सोपे उखाणे

1.जीवनसाथी वर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट परंतु…..रावांनी केले मी,आयुष्यभरासाठी except

2.जेठालाल ची बायको असून, फेवरेट आहे बबिता,….रावांचे नाव घेते, माझे नाव सरीता

3.लाल मणी तोडले काळे मणी जोडले, ….. रावांसाठी मी सात जण सोडले

4.खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ, ….अहो सगळीकडे जाऊया, लॉकडाऊन नंतर भेट

5.छोट्या टेकडीवर बांधले, मोठे फॉर्म हाऊस, घास भरवतो….., बोटं नको चावूस

मराठी उखाणे टाईमपास

1.चहा गरम रहावा म्हणून, कपावर ठेवली बशी, ……माझी गरीब गाय,बाकी सगळ्या म्हशी

2.खाऊच्या पानावर ठेवली थोडी कात….रावांचे माझ्या सशासारखे दात

3.ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस…..राव आहेत एक नंबर कंजूस

4.गुलाबाचे फुल, वाऱ्यावर लागते डूलू, दिवसभर सुरू असते….चे गुलूगुलू

5.लिपस्टिक वाढवते ……ची ब्युटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डुटी

Comedy ukhane marathi

1.चांदीच्या ताटात मुठभर गहू, लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

2.एक होती चिऊ,एक होता काऊ ……रावांचे नाव घेते डोकं नका खाऊ

3.सोन्याचा रांजण चांदीच झाकण……रावांच्या बहिणी माझ्या चपलाला राखण

4.गाडीत गाडी डेक्कन क्विन……आहे माझी ब्युटी क्वीन

5.सासरच्या मांडवात पंचपक्वणांच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवून गेले, जावई राहीला उपाशी

उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव

1.….. चा आणि माझा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि तो लावेल कुक्कर

2.इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर …..च नाव घेते …… ची लव्हर

3.श्रावणात पडतोय पारिजातकांचा सडा, …..ना आवडतो गरम गरम बटाटेवडा

4.नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद…..तर आहेत माझ्या डाव्या खिशात

5.वड्यात वडा बटाटावडा …….ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा

Best comedy ukhane marathi for female

1.डाळीत डाळ तुरीची डाळ, ……च्या मांडीवर खेळविन एका वर्षात बाळ

2.सुंदर सुंदर हरिणाचे इवले इवले पाय, आमचे हे अजून कसे नाही आले, गटारात पडले की काय

3.गच्चीवर गच्ची सिमेंट ची गच्ची, …..माझी बायको आहे मोठी लुच्ची

4.इस्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ, माझ्या ……चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

5.फेसबुक वर ओळख झाली, आणि व्हॉट्सअँप वर प्रेम जुळले, ………आहे किती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

Latest funny ukhane in marathi

1.माझ्या ……. चा चेहरा, आहे खूपच हसरा, टेन्शन,प्रोब्लेम सगळे क्षणा मध्ये विसरा

2.……..सोहळ्याला सर्वजण झाले, आनंदाने जॉईन …… माझा हिरो , नी मी त्याची हिरोइन

3.धान्यांचे पोते सुईने उसवले,…..रावांनी मला पावडर लाऊन फसवले

4.एकटीचा dp ठेवून आला मला कंटाळा जस्ट married आपण,आपल्या जोडीचा खास फोटो निराळा

5.Tula आवडे फिरायला शॉपिंग मॉल, मी तुझा हँडसम हंक आणि तू माझी बेबी डॉल

बायकांचे उखाणे

1.सगळेच म्हणतात चित्रा तुझी ए वन, मला वाटते आपली जोडी नंबर वन

2.भल्या पहाटे, करावी नवऱ्याची पूजा …..रावांच्या जिवावर करते मी मजा

3.उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी, ……. रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी

4.बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून …. सोबत तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

5.अलिबागच्या समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, ……राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू

Funny ukhane marathi for Female

1.शंकरपाळीत तूप असावे ताजे अन् साजुक, ….राव आहेत आमचे फार नाजुक

2.केळीचे पान टराटरा फाटते, सासूबाईंच्या कारट्याच…..नाव घ्यायला मला लाज वाटते

3.हल्लीच्या जमान्यात सर्वांना समानता आवडे मी घासली भांडी ,तर ….राव तुम्ही धुवा कपडे

4.वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरे घातले किसून, …….राव बसले कोपऱ्यात रुसून म्हणून मी जाते…वांच्या गाडीत बसून

5.शिडी वर शिडी बत्तीस शिडी …..राव ओढतात बिडी अन् मी लावते काडी

Funny ukhane marathi for male

1.चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे अन् लसूण…..रावांच नाव घेते…..रावांच्या मांडीवर बसून

2.मोबाईल वर FM ऐकते कानात हेडफोन टाकून, …….रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स राखून

3.आज झाल आमचं लग्न, लग्नात आला होता बँडवाला, …… नाव घेतो में झुकेगा नहीं साला

4.गरम गरम पावभाजी बरोबर नरम नरम पाव,…….माझी राणी वाटते बरी पण खाते खूप भाव

5.आकाशात उडतोय पक्षांचा थवा……चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

Funny ukhane in marathi

1.काचेच्या ग्लासात कोकम चा सरबत……शिवाय मला नाही करमत

2.मटणाचा केला रस्सा,चिकन केले फ्राय…..भाव देत नाही कितीही केले ट्राय

3.काट्यात काटा गुलाबाचा काटा, …..नाव घेतो गुलाबजाम खाता खाता

4.तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला …..ने खाल्ला जास्तच भाव

5.नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री …..झाली आज माझी गृहमंत्री

6.डास चावला की येते अंगाला खाज, …..चे नाव घेतो तुमच्यासाठी आज

धन्यवाद ..! असेच नव-नवीन पोस्ट पाहण्यासाठी आपल्या suvicharguru website ला अवश्य भेट द्या. इथे तुम्हाला नवनवीन content पहायला मिळेल.

Treading

More Posts