Taunting Quotes In Marathi | 100+मराठी टोमणे स्टेटस
Taunting Quotes In Marathi
Taunting Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी इतरांना काहीना काही कारणांवरून टोमणे मारत असतो. टोमणे कधी सिरिअसली मारतो किंवा असचं मस्ती मध्ये बोलतो. असेच काही नवनवीन (Taunting Quotes In Marathi) मराठी टोमणे इथे दिलेले आहेत. Taunting Quotes In Marathi तुम्ही इथून Download करू शकता तसेच शेअर करू शकता.
आवडीचे लोकं सवडीने वागायला लागले की,
नात्याला कवडीची किंमत राहत नाही..
काही माणसं ही काजव्यासारखी असतात,
जी विनाकारण जळत राहतात..
नाते-गोते भरपूर असयला पाहिजे,
पण नात्याला गोत्यात आणणारे
एकही नाते असायला नको..
दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं..
You May Like : Heart-touching sad quotes in marathi
हे देवा…
माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना
दीर्घ आयुष्य लाभू दे आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे..
हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय,
कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात..
चमचागिरी करणे हे काही सोप्प काम नाही,
कारण त्याला पण talent लागते..
भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत,
आणि चावणारी कुत्री कधीच भुंकत नाहीत.
बाळा तू गेम व्यवस्थित खेळलास,
पण प्रतिस्पर्धी तू चुकीचा निवडलास.
वेळ बदलली तुम्ही पण बदला,
काळ बदलला तुम्ही पण बदला,
पण हे दोन्ही बदलले म्हणून तुमच्यावर
झालेले संस्कार कधीच बदलू नका.
वेळ चांगली असेल तर
इतरांना मदत करा,
आणि जर वेळ वाईट असेल
तर कष्ट करायची तयारी ठेवा.
खोटं बोलणं हे कोणत्याही नात्याचा
शेवट करण्यासाठी पुरेसे आहे,
कारण सत्य हे आज ना उद्या उघडकीस येतेच.
प्रत्येक माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका,
कारण माणसे तुम्हाला काय बोलतात
यावरून त्यांची लायकी कळते तुमची नाही.
सून आणि मान्सून यांची लोकं
आतुरतेने वाट बघतात आणि
आल्यावर थोड्याच दिवसात चिडचिड करतात.
नेहमी तिचं लोकं आपल्याकडे बोटं दाखवतात,
ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते.
एक पायरी सोडून चालणाऱ्याचे,
पाय नेहमीच दुखतात.
पाय ओढण्याऐवजी, हाताला धरून ओढा
पाहा सगळेच पुढे जातील.
जर मिळाली कोणाला संधी तर
सारथी बना स्वार्थी नाही.
मी लोकांचा अपमान करत नाही,
फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढंच दाखवून देतो..
आम्ही वाईटच ठीक आहोत,
किमान चांगलं बनण्याचे
नाटक तरी करत नाही.
लोकांना डोक्यावर घेऊन बसू नका,
मान लाचकेल.
माणूस हा स्वतःच्या चुकांसाठी,
उत्तम वकील असतो, आणि
दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो.
सावध रहा या दुनियेत कारण येथे
इच्छा पूर्ण झाली नाही तर देव
पण बदलला जातो
हातात कॅडबरी असताना समोर
आलेले बिस्कीट तुला सोडवत नाही
विचार असे मांडा की, समोरच्याने
तुम्हाला म्हटलं पाहिजे की,
चल उठ इथून…
या जगात एकच गोष्ट सोपी आणि साधी आहे,
ती म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणे.
हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा
माणसेच जास्त आडवी येतात.
सल्ला नेहमी स्पष्ट बोलणाऱ्याकडून घ्यावा,
गोडबोल्यांकडून नाही.
काही लोकं चपलासारखे असतात,
साथ देतात, पण मागून चिखल उडवतात.
जग खूप सुंदर आहे,
पण मी नालायक आहे.
पापाचा घडा भरला की,
तो घडा बाजूला काढा
आणि ड्रम लावा,
कारण तुम्ही सुधारण्यातले नाही.
काही माणस लाखात एक असतात,
आणि काहिंकडे लाख असले
तरी माणसात नसतात.
एक विनंती आहे….
दूरच जायचे असेल तर जवळच घेऊ नका,
बिझी सांगून टाकायचं असेल तर वेळच देऊ नका.
एका कानाने ऐकून, दुसऱ्या कनानी सोडणे
is much better than
दोन्ही कनानी ऐकून मनावर न घेणे.
खरंय ना….
नशिबापेक्षा जास्त आपलेच लोक
आपलीच मरतात ते पण पध्दतशीर पणे.
फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या,
जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच
भंगाराच्या भावात विकलेले असतात.
चाळणीमध्ये सुध्दा पाणी साठवता येईल,
पण त्यासाठी बर्फ होई पर्यंत संयम हवा.
कर्म जेव्हा वसुलीला येतं, तेव्हा
कोणाचाच वशिला चालत नाही.
टोमणे मारणं ही एक कला आहे,
पण मारलेला टोमणा समजून न
समजल्यासारखं वागणं,
ही त्याहून ही मोठी कला आहे.
अनुभव सांगतो, शांतता चांगली
कारण शब्दाने लोक नाराज होतात.
Give respect take respect
बाकी आईचा लाडका अन् पप्पांची
परी ते आपापल्या घरी.
मतलबी आहे दुनिया,
इथे फक्त गरज भागून घेतात.
आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे
म्हंटल्यावर काट्यांना सामोरे जावंच लागणार.
इकडच्या गोष्टी तिकडे आणि
नंतर गावभर करण्यात ई-मेल
पेक्षा female पुढे आहे.