Sad quotes in marathi | 100+मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मराठीतील दुःखी कोट्स
Sad quotes in marathi
Sad quotes in marathi : नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात, ज्यामुळे आपल मन उदास होतं.आपण नाराज होतो. ज्यावेळेस आपण उदास असतो तेव्हा इंटरनेटवर आपल्या मनाला स्पर्श करणारे Sad quotes वाचतो. आणि थोडा आधार मिळतो. असेच काही नवनवीन Sad quotes in marathi इथे दिलेले आहते ते तुम्ही Download करू शकता तसेच आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना देखील पाठवू शकता.
सगळ्यांसाठी मी आहे पण
माझ्यासाठी कोणीच नाही
सगळ्यांना मीच समजून घेऊ का
मला पण कोणीतरी समजून घ्याना
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते
आज खूप दिवसांनी मन
भरून रडावं वाटलं
मनातलं सार दु:ख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं
कारण कुणाला कितीही जीव लावा
कुणीच कोणाचं नसत
अधिक वाचा : Taunting quotes in marathi
इग्नोर करणे हा तर एक बहाणा असतो
प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात तुमची
गरज संपलेली असते
आयुष्यात खूप काही मिळत असत
पण आपण तर जे मिळाल नाही
तेच मोजत बसतो
माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा
आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो
जेव्हा माणसाला एकट राहायची सवय लागते
मग नंतर सोबत कोणी असो किंवा नसो
काही फरक पडत नाही
जेव्हा विश्वास मोडलेला असतो तेव्हा
sorry सुद्धा काहीच नाही करु शकत
आज माझ्याच सावलीला विचारलं
मी का चालते तू माझ्यासोबत
सावलीने पण हसत उत्तर दिलं
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत
एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो
तर त्रो तेव्हा वाटतो जेव्हा
आपल्या बरोबर सर्व जण असतात
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला
आपल्या बरोबर हवी असते
जवळची नाती ही माणसाला कधी-कधी
खूप छळतात जितके जास्त जपाल तितके
आपल्याला आणखी दूर लोटतात
कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात हे स्वतःचा जीव
जपत रहा कारण जीव माझा तुझ्यात आहे
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस
वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस
काय हवं होतं तिला,
मला कळलचं नाही,
घेऊन गेली हृदय,
पुढचं मला माहित नाही
खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो,
जे लोकं कधीच दुसऱ्यांना धोका
द्यायचा विचार पण करत नाही
का कधी कधी असं होत,
आपण ज्या व्यक्ती शिवाय एक
क्षणही राहू शकत नाही आणि
तिचं व्यक्ती आपल्या शिवाय खूप सुखी असते
कधी-कधी सहन करण्यापेक्षा
सोडून देणंच योग्य असत
जबरदस्तीच्या नात्यापेक्षा एकटेपणाची
दुरी कधीही चांगली असते आयुष्यात
बोलणारा सहज बोलून जातो
पण त्याला कुठे माहित असत
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो
कोणाला कधीच दोष देऊ नका
कारण तुम्हीच त्यांच्याकडून
जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या
कोणावर इतकही जास्त प्रेम करू नये
की स्वतःच्या आयुष्यापेक्षा ती व्यक्ती
जास्त महत्वाची होईल
कोणाला कितीही द्या,
कुणाला किती ही जीव लावा,
कुठेतरी काहीतरी कमी पडतच
माझ्यात आणि तुझ्यात फरक इतकाच आहे
तू माझ्यासाठी सर्वकाही आणि
मी तुझ्यासाठी काहीच नाही
चालताना आज परत ठेच लागली
पुन्हा एकदा रस्ता चुकलाय
तुझा वाटेवरचा दगड सांगत होता
जगात जेवढी गर्दी वाढत चालली आहे
लोकं तेवढेच एकटे पडत चाललेत
तुटलेल्या नात्याचा विचार मनातून
काढून टाका कारण मेलेल्या फुलाला
पाणी देऊन काही उपयोग नाही
जेव्हा पण कोणावर प्रेम
करायचा विचार मनात येतो
तेव्हा पुन्हा हृदय तुटण्याची भीती वाटते
आजही डोळे ओले करू जातात
आयुष्यात काही क्षण असे असतात कि
त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते
ज्याची मस्करी करणार कुणी नसतं
त्याच्यावर प्रेम करणार ही कुणी नसत
तिला सवयच होती हृदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांशी खेळून
कुणास दुखावू नये गंमत म्हणून
बरंच काही गमवाव लागतं किंमत म्हणून
कुणीच कोणाच नसत असं
फक्त म्हणायचं असत
मनाच्या कोपऱ्यात मग
कुणासाठी तरी झुरायचं असत
वेळ अशी आहे कि जगण्याची
इच्छा नाही आणि मरणही येत नाही
तुझ्यावर नाही तुझ्या वेळेवर नाराज आहे
जो तू माझ्यासाठी देवू शकत नाही
एखाद्याला खूप जीव लावूनही तो
आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
तेव्हा आपल्या मनाला खुप वाईट वाटत
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की
समजाव माणुसकी अजूनही जिवंत आहे
कोसळणारा पाऊस पाहून मला
नेहमीच एक प्रश्न पडतो
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतोय
खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्याशिवाय जगू शकत नाही
असे म्हणणारेचं एक दिवस सोडून निघून जातात
खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत
केल्याशिवाय काहीच मिळत नाही
अहो खरे काय ते मला विचारा ना
ह्या अश्रूंसाठी काहीच मेहनत करावी लागतं नाही हो