Self motivational quotes in marathi |70+स्व:ताचा आत्मविश्वास वाढविणारे कोटस

Self motivational quotes in marathi

Self motivational quotes in marathi

Self motivational quotes in marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये स्वतःला motivate कसं ठेवायचं, कसं खुश राहायचं, याबाबत काही self motivational quotes in marathi दिलेले आहेत. ते वाचून तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकता.

Self motivational quotes in marathi
Self motivational quotes in marathi

खचलो होतो, रडत होतो, हरलो होतो,
कोणीच नव्हतं सोबती,
तेव्हा फक्त बापाचाच हात होता डोक्यावरती.

स्वतःचं घर, घरासमोर गाडी, हसणारी आई,
अभिमानाने छाती फुगून उभा असलेला “बाप”,
हे पाहण्यासाठी कष्ट करतो आज.

घराबाहेर राहून घरी येण्याची इच्छा नाही,
घरात माझा घर पण नाही शोधू कुठे मी वाट,
माझी वाटेवरती माझ्या घरचाच पत्ता नाही.

आवडत्या व्यक्तीचे लांब राहणं बरं नसतं,
मनाला बेचैन करत सोसणं बरं असतं,
आवडतं त्याला सोडून जगणं बरं नसतं…

जबाबदारीची जाण, जाणवणारा भार, कुटुंबाचा विचार,
त्यात कठोर दिसणार, फक्त कमजोर असणार हृदय.

आपण कितीही भांडलो जरी, तरी सोबत उभा राहून ,
अडचणीत साथ देणारे फक्त “आई-वडील” असतात.

आपण कुठल्या परिस्थितीत वाढलो, लहानपण पाहिलं,
यापेक्षा आपण किती चांगल्या परिस्थितीत
आई-वडिलांना घेऊन जगतो हे महत्त्वाचं.

नियतीने परत मला तिथेच आणून सोडलं,
तिथून सावरायला मला अनेक वर्ष गेली.

तुम्हाला तिला पंख ही द्यायचेत आणि उडणार की नाही,
यावर अधिकारही गाजवायचा आहे, मग कसलं हे “स्वातंत्र्य”.

अधिक वाचा : नवरीसाठी खास मराठी उखाणे

Self motivational quotes in marathi
Self motivational quotes in marathi

जगण्याचं कारण शोधत राहिलो,
“जगायचं” होतं यासाठी
आता कारण भेटलं, जगायचं,
पण इच्छा उरली नाही “जगण्यासाठी”.

कोसळलो होतो जेव्हा मरण जवळ केलं,
बापाने हात धरून पुन्हा जगणं शिकवलं.

वादळाला कोणी रोखू शकत नाही तसंच,
मला उंच भरारी घेण्यापासून कोणी थांबू शकत नाही.

कसली नाती, कसलं रक्त, गरजेपुरतं असतं,
त्याचं आपल्या सोबत असणं….

मुलगी होऊन मुलाचे कर्तव्य ती पार पाडते,
लढते फ्रीडम करिता तरी सगळ्यांचे मन राखते,
सिद्ध करूनही अस्तित्व स्वतःचं, ती चार भिंतीत कैद राहते,
ऐकून घरच्यांचं ती नेहमी मन मारते…..

पुढे चालल्यावर मागे खेचणारे हात नको,
सोबत चालणारे पाय हवेत,
आभासी दुनियेत या कट्टर साथीदार हवेत…..

हौस तर वडिलांच्या पैशावर व्हायची,
स्वतः कमवायला लागल्यावर फक्त गरजा पूर्ण होतात,
इच्छा मारून जबाबदाऱ्या सोबत चालतात…

आयुष्य निसटून गेलं काहींचे,
काहींना आयुष्याची किंमत नाही,
गप्पा चालल्या लोकांच्या,
मेली त्यांना कोणी वारसदार नाही….

बाहेर वातावरण दूषित झालं,
म्हणून घरात कचरा करायचा नसतो,
कोणाचं बघून कोणावर आरोप लावायचा नसतो….

कोसळणाऱ्या घराला कोण सावरत नसतं,
आभासी दुनियेत बापाशिवाय सोबत कोण उभे राहत नसतं…

जे आपलं असतं ते लांब जात नसतं,
लांब गेलेलं कधीच आपलं नसतं,
गेलं जे निसटून त्याला आठवत बसायचं नसतं…

लांब गेल्यावर किंमत कळून काय उपयोग,
जवळ असताना मोल जाणले नाही.

दुःखात सोबत असलेला खांद्याला,
सुखात विसरत नाही मी,
आभाळभर उंच भरारी घेतली

तरी मुळाला विसरत नाही मी.

Self motivational quotes in marathi
Self motivational quotes in marathi

समजून सांगणाऱ्यांपेक्षा,
समजून घेणारी व्यक्ती महत्त्वाची.

स्वतःचा दुःख ऐकलं कोणी तर बरं वाटतं,
तसं दुसऱ्याचं दुःख ऐकता यावं वाहणाऱ्या अश्रूंना
थांबवतानाही आलं तरी चालेल पण कोणाचा
तरी रडताना खांदा बनता यावं….

अडचणी खूप आहेत माझ्या आयुष्यात पण,
त्यांना मात करत मी पुढे जात राहणार,
आयुष्य परीक्षा घेत राहील सतत पण
मी काठावर का होईना पास होत राहणार.

अस्तित्वाच्या लढाईत मी लढाई जिंकले होते,
हात धरले अशा व्यक्तीने पुढे
जाण्यास पाऊल माझे रोखले होते..

माझ्या हळव्या मनाला जितका वेळा त्रास झाला,
तेवढा मन कठोर होत गेलं प्रेम, आपुलकी, दया,
याचा नायनाट होत हृदय कठोर होत गेलं…

आपल्यासारखं आपल्याला हवं असतं कोणीतरी,
आपलं हक्काचं आपल्याला हवं असतं कोणीतरी,
अगदी हक्काच्या घराप्रमाणे……

सतत वाटते एकटे, एकटे वाटणे बरे नव्हे,
गर्दीत राहून सतत एकटे झुरणे बरे नव्हे…

आपलं महत्त्व आपणच पटवून द्यायचं असतं,
जगाला घरच्यांना त्या चार लोकांना….

ते तुला त्यांच्या शब्दातून कमीपणा दाखवतील,
तू स्वतःला कमी समजू नकोस ते सतत तुला
खाली पाडून वागवतील तू स्वतःला वाईट वागवू नकोस..

पाण्याची स्थिरता बघून खोलीचा अंदाज लावू नये,
तसेच शांत असणारे व्यक्तीच्या रागाचा अंदाज लावू नये..

घरच्यांना बदलता येत नसतं,
आपण त्यांना बदलणं बंद करावं,
नाहीतर घर सोडावं लागतं,
आपल्या मानसिक संतुलनासाठी..

आयुष्य घाबरवेल, तू घाबरू नकोस,
मरण्याआधीच तू मरू नकोस.

नात्यांच्या चक्रात असा अडकून गेलोय,
एका बाजूला श्वास अडकलाय
आणि एका बाजूला आयुष्य….

घरात घराबाहेरची व्यक्ती जेव्हा येते,
कायमची तेव्हा घर सुधारत नाही,
तर भरलेलं घर खाली होतं…

त्याच्यासोबत कोणी नसतं,
त्याला स्वतःची सोबत व्हावी लागतं,
एकटच सगळ्यांचे विरोधात लढावं लागतं,
स्वतःला सिद्ध करण्यासाठी…

घरामध्ये घरपण नाही,
बाहेर जाण्याची इच्छा नाही,
हक्काचा एक कोपरा नाही
मी आता कोणाचाच नाही..

आत्मसन्मानापुढे काहीही महत्त्वाचं नाही,
निर्भीडपणे कर्तृत्वाने स्वावलंबी बनवला आहे
स्वतःला त्यापुढे कोणीही महत्त्वाचं नाही..

तिळ तिळ राख होण्यापेक्षा,
एकदाच राख झालेलं बरं,
तिळ तिळ रडण्यापेक्षा
एकदाच सगळ्यांना रडवलेलं बरं..

अपेक्षा, इच्छा, स्वप्न मरताना पाहणं सोपं नसतं,
आपल्याच घरात परक होणं सोपं नसतं…..

माणूस दूर जात असला तर त्याच्याजवळ जायचं नसतं,
दूर जाण्याआधी त्याने हजारवेळा विचार करून
दूर जाणं निवडलं असेल म्हणून,
उगाच दगडावर डोकं आपटायचं नसतं
तसही इच्छा नसलेलं नातं जोडून ठेवणं
म्हणजे मुडद्याला अत्तर लावून सोबत ठेवणं..

Treading

More Posts