Shree swami samarth tarak mantra lyrics (स्वामी समर्थ तारक मंत्र)

Shree swami samarth Tarak mantra lyrics

Shree swami samarth Tarak mantra lyrics

Shree swami samarth Tarak mantra lyrics: नमस्कार मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश्श्वर यांचे अवतार आहेत. म्हणूनच त्यांना ब्रम्हांडनायक असे म्हणतात. स्वामी महाराज हे कर्दळीवनातून प्रकट झाले. स्वामींचे अनंत अवतार आहे आणि ते त्यांनी दाखवले पण आहेत. स्वामी महाराजांनी त्यांच्या भाक्त्रांसाठी कधी विठुरायाच तर कधी देवी आईच रूप धारण केलेलं आहे. अक्कलकोट, गाणगापूर, दिंडोरी ,या ठिकाणी भाविक भक्त स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यास जातात. स्वामी महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे तसेच इथे Shree swami samarth Tarak mantra lyrics दिलेले आहे ते तुम्ही डाउनलोड देखील करू शकता.

Shree swami samarth Tarak mantra lyrics
Shree swami samarth Tarak mantra lyrics

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

श्रीमन्-महा गणाधिपतये नम: l
श्री गुरवे नम: l
श्री स्वामी समर्थ महाराजाय नम: l

Swami samarth tarak mantra (स्वामी समर्थ तारक मंत्र)

नि:शंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेवीणा काळ ही ना नेई त्याला
परलोकी ही ना भीती तयाला

उगाची भितोसी भय हे पळु दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे
जगी जन्म मृत्यु असे खेळ त्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा

खरा होई जागा श्रध्येसहित
कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिला त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ

विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ
स्वामीच हे या पंच प्राणामृतात
हे तीर्थ घेई आठविरे प्रचिती
न सोडी कदा स्वामी जय घेई हाती

श्री स्वामी चरण विंदापर्णमस्तू

श्री स्वामी समर्थ महाराज की जय |

श्री अक्कलकोट निवासी,राजाधिराज,
योगीराज,ब्रम्हांडनायक श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय |

उदय्स्तु | उदय्स्तु | महालक्ष्मी,सरस्वती,राजराजेश्वरी,आईसाहेब, बोल अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय | भारत माता की जय |


Treading

More Posts