Attitude Marathi Tomne In Marathi |100+अ‍ॅटिट्यूड मराठी टोमणे

Attitude Marathi Tomne In Marathi

Attitude Marathi Tomne In Marathi

Attitude Marathi Tomne In Marathi: नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण Attitude Marathi Tomne In Marathi लिहिलेले आहेत. याचं कारण असं की Attitude आणि Ego हा प्रत्येक माणसात पाहायला मिळतो. आणि तो सकारात्मक किंवा नकारात्मक ही असू शकतो. काही Attitude Tomne हे फक्त कोणाला टोचून बोलण्यासाठी नसतात तर त्यात आपला स्पष्टपणा, आणि आपली भूमिका दाखवण्यासाठी असतात. काही लोक आपल्या बोलण्यातून, वागण्यातून स्वतःचा attitude दाखवत असतात, तर अशाच इथे दिलेल्या टोमण्याचा वापर करून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता.

या पोस्ट मध्ये आपण थोडासा हटकेपणा आणि दमदार असे Attitude Marathi Tomne दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना पाठवू शकता.

Attitude Marathi Tomne In Marathi
Attitude Marathi Tomne In Marathi

मी तुझी आठवण काढावी,
एवढी तुझी लायकी नाही.

नावाची हवा झाली नाय तरी चालेल,
पण नाव ऐकून समोरच्याची
100% फाटली पाहिजे..

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो,
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

काही लोकं एवढे चांगले स्टेटस ठेवतात की,
जसं काय आम्हाला त्यांचे कांड माहितीच नाही.

Attitude माझ्यात खूप आहे पण दाखवत नाही,
कारण माणुसकी आडवी येते…

इज्जत दिल्यावर माज येतो लोकांना,
म्हणून झेलायची सवय सोडा आणि
कोलायची सवय लावा..

आग लावणाऱ्यांना कुठे माहित आहे की,
वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची पण राख होणार आहे.

आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

आम्हाला बाद करण्याची स्वप्न बघू नका,
तुमचे दहा पिढ्या जातील,
आमचं नुसतं नाव पुसायला.

अधिक वाचा : Good Morning Message In Marathi

ज्याच्यापासून मी लांबच राहतो,
त्यांनी समजून घ्यावं की आपण
आपली लायकी दाखवलेली आहे.

एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडणे,
इज मच बेटर दॅन दोन्ही कानाने ऐकून मनावर घेणे.

लोकांसाठी आपली किंमत
फक्त त्यांची गरज ठरवते.

Attitude Marathi Tomne In Marathi
Attitude Marathi Tomne In Marathi

आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदात जगा,
कारण इथे वन्स मोर नसतो.

माणसं जरी सोन्यासारखी असली तरी,
त्यांच्यातही कॅरेटचा फरक असतोच.

आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा,
आधी आपलं कुठे चुकलं ते तपासून पहा,
कदाचित आपली चूक आहे, हे लक्षात येईल..

ही दुनिया जंगलाच्या कायद्यावर चालते,
शिकारी व्हायचं, का शिकार आपण आपलं ठरवायचं.

काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय,
मनासारखे दिवस जगता येत नाही.

सिंगल पणा हा रोग नाहीये,
इलाज आहे खुश राहण्याचा.

सगळे चांगले असतात,
फक्त ज्याची त्याची चुना
लावण्याची पद्धत वेगळी असते.

मला फक्त मीच ओळखतो.
बाकीचे फक्त अंदाज लावतात.

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली,
ती परत गेलीच नाहीत आणि जी गेली,
ती माझ्या लक्षात नाही…

पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांची एकच अडचण असते,
समोरून रडायची त्यांची लायकी नसते.

उगाच कोणाला भाव देत बसायचं नाही,
जे आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी विषय संपला.

जीव लावणाऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त जीव लावतो,
आणि ज्यांनी धोका दिलाय त्यांचं तोंड सुद्धा पाहत नाही
एवढा तर स्वाभिमानी आहे मी.

Attitude Marathi Tomne In Marathi
Attitude Marathi Tomne In Marathi

एकट्यावर वेळ आल्यावर कळतं,
आपले आधारस्तंभ आपणच आहोत.

वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला
महत्व नाही तिथे वेळ देऊ नका.

ज्याला माणसं सांभाळता येत नाही,
त्यांनी कमीत कमी तोंड तरी सांभाळलं पाहिजे.

एकदा मनातून उतरलेले माणसं,
आम्ही पुन्हा मनात ठेवत नसतो.

आम्ही घरची परिस्थिती ठीक करण्यात व्यस्थ आहोत,
आमच्या वाटेला प्रेम नाही संघर्ष आलं आहे.

आयुष्यात इगो आणि एटीट्यूड
हा असायलाच पाहिजे,
कारण लोकांना किंमत दिली की
ते गंमत करायला बघतात.

जेव्हा एका वाघाला हरवण्यासाठी,
सगळी कुत्रे एकत्र झाले ना
मग समजून जायचं,
आपला वाघ इमानदार आहे.

माणसा माणसात खूप फरक असतो,
कमावलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देण्यासाठी
काहीजण आयुष्यभर झटत असतात तर काहीजण,
धोका देण्यासाठी मोकाच बघत असतात.

हिशोब ठेवायला मी शिकले आहे,
आता माझ्या शांतपणाचा गैरफायदा
घेतलेल्यांचं बिल वेळ आल्यावर फाडते.

फक्त तु सोबत रहा,
बाकी मला कोणाची गरज नाही भावा.

कोणी कितीही इमानदारीच्या गप्पा मारू द्या,
गद्दार हे कायम आपल्या जवळचेच असतात.

वेळ वाईट आहे बदलून जाईल पण,
बदललेली लोकं आयुष्यभर लक्षात राहतील.

स्वतःची ओळख स्वतः तयार करा,
उद्या कोणी म्हणायला नको
याला मी मोठ केलंय.

तुझा घमंडच तुला रडवणार,
आम्ही काय होतो ते वेळच सांगणार.

आम्ही त्यांनाच टक्कर देतो जे,
स्वतःला खूप मोठी तोफ समजतात.

सहनशक्ती असावी पण एवढी ही नसावी,
की आपलं अस्तित्वच नाहीस होईल.

ज्यांनी ज्यांनी औकात काढली
त्यांना एकच सांगण आहे,
थोड्या दिवसातच भेटू
आणि औकातीवर चर्चा करू.

धोका तर आपलेच देतात,
नाहीतर परके चुकून धक्का लागला
तरी माफी मागतात…

पिंजऱ्यात असलेल्या पोपट्यांनी,
गरुडाला कस उडायचं ते शिकवायच नसतं.

लाखात एक वाक्य,
जेव्हा गरज असते तेव्हा,
प्रत्येकाची भाषा गोड असते.

चुकीला माफी असावी पण विश्वासघात,
करणाऱ्यांची आयुष्यात पुन्हा भेट नसावी.

Treading

More Posts