Barshache Ukhane In Marathi | 250+बारशाचे उखाणे मराठीमध्ये
Barshache Ukhane In Marathi
Barshache Ukhane In Marathi : नमस्कार मित्रांनो, आपल्या घरी पाळणा हलणे, आपण आई-वडील होणार आहोत असं जेव्हा एका आई-वडिलांना समजत तेव्हा त्यांचा आनंद गगनात समावत नाही. मुलगा होणार की मुलगी याची चाहूल लागलेली असते. मुलगा झाला तर त्याचे नाव की ठेवायचे किंवा मुलगी झाली तर तिचे नाव काय ठेवायचे असं खूप मोठा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला असतो पण तो एक वेगळाच आनंद असतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच स्मितहास्य असतं.
कसं आहे मंडळी…लग्न झाल की इवल्या – इवल्या पावलांची चाहूल लागतेच, तेच चिमुकले पाऊल जन्म घेऊन आले की त्याचं बारसं घातलं जातं म्हणजेच नामकरण केल जात. आजकाल उखाणे कुठ घेतले जात नाहीत? पूर्वीपासून चालत आलेली बाळाच्या आईने आणि बाळाच्या वडीलांनी नाव(उखाणा) घ्यायची ही परंपरा आहे. त्यामुळे तुमच्याही घरात कोणाच बारसं असेल किंवा तुम्ही बाळाचे आई-वडील असाल तर इथे Barshache ukhane, Barshache Ukhane In Marathi, Naming ceremony barshache ukhane दिलेले आहेत ते तुम्ही Download करू शकता.
Barshache Ukhane In Marathi
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
………रावांच्या संसारात पडली नवी भर
चंद्राला साथ चांदण्यांची, डोळ्यांना साथ पापण्यांची,
……….रावांसोबत धरते दोरी……..च्या पाळण्याची
अधिक वाचा :
दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
आज ………च्या मुलाच्या बारशाचा दिवस
मावळला सूर्य उगवला शशी,
………चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
लक्ष्मी म्हणू की सरस्वती, राजकुमारी म्हणू की परी,
……..राव आणि ……….मध्ये सामावली माझी दुनिया सारी
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊ ची कुशी,
………….चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
हिरवं लिंबू गारसं,
……….रावांच्या बाळाचं आज बारसं
………च्या येण्याने पूर्ण झाले आमचे घरकुल,
……..रावांसोबत सुखी भविष्याची लागली नव्याने चाहूल
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
………….च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट
नाटकात नाटक गाजलं वस्रहरण,
………चं नाव घेते बारशाचं कारण
कृष्णासारखे रूप, फुलाप्रमाणे हास्य,
……..राव आणि मी मिळून घडवू ……..चे भविष्य
कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी-कुंकवाच्या राशी,
……….चं नाव घेते ……..च्या बारशाच्या दिवशी
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
दोघांची नावे घ्यायची, आमच्या जीवनात आला तिसरा साथी
नाही कशी म्हणू तुम्हा, घेते मी नाव,
……….रावांच्या बाळाला दिले, तुम्ही गोड नाव
लिंबू पाणी, छान लागतं गारस,
………..रावांच्या, बाळाचं आज बारसं
Naming ceremony barshache ukhane
दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
आज …….च्या मुलाच्या बारशाचा दिवस
बाळाचे नाव ठेवायला, जमल्या साऱ्या मावशी,
……..रावांचे नाव घेते, बारशाच्या दिवशी
पाहुणे येणारं म्हणून, वाटून ठेवलं सारण,
………..रावांच नाव घेते, बारशाच कारण
…………रावांनी दिला बाळाच्या मातेचा मान,
कुलदीपक तो आमचा आहे घराण्याची शान
रांगणारा बाळकृष्ण देई घराला घरपण,
………..चे नाव घेते बारसं आहे कारण
आईपणाचं भाग्य आलं माझ्या पदरी,
……..चं नाव घेते बारसं आहे घरी
मथुरेत जन्म, गोकुळी वाढला,
……..रावांच नाव घेते बाळ साक्षी त्याला
पहिली वहिली लेक माझी धनाची पेटी,
………रावांच नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
जन्म दिला बाळाला मी झाले माता,
………चं नाव घेते मी तुमच्याकरिता
Barshache ukhane
सासूबाई प्रेमळ माझ्या आठवत नाही माहेर,
……..रावांनी दिला मला मातृत्वाचा आहेर
नातवाचं तोंड पाहून सुखावल्या दोन्ही आज्या,
………….चं नाव घेते जमल्या मैत्रिणी माझ्या
बाळाच्या जन्माबरोबर घर झालं गोकुळ,
……….रावांच बाळ पाहून आनंदलं घरकूल
विस्तारली वंशवेल, आनंदले सारे,
………..रावांच्या घरात आनंदाचे वारे
चंद्राच्या शीतल चांदण्यात रोहिणी करते मंद हास्य,
………रावांच नाव घेते, बाळाचं आज आहे बारसं
आंब्याच्या डहाळीवर कुहूकुहू करते कोकिळा पक्षी,
…………..रावांच नाव घेते बारश्याच्या दिवशी
सर्वांच्या हट्टासाठी उखाणा आठवते,
…….रावांच नाव घेऊन, बाळाचं नाव ठेवते
हिरव्या-हिरव्या शेतात, पिकली मोत्याची कणसं,
………..रावांचं नाव घेते आज आहे बारसं
बागेमध्ये उमलली गुलाबाची कळी,
……….रावांची कन्या आहे सुंदर सोनकळी
माहेर आहे शीलवंत, सासर आहे कुलवंत,
……….रावांचे बाळ होवो औक्षवंत
फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे,
…………रावांच्या बाळाचे आज आहे बारसे
कळ्या हसत आहेत, वाऱ्याच्या हर्षाने,
………रावांच्या ओटीत दिले मी बाळ, एका वर्षाने
मेकअप करायला, पाहिजे समोर आरसा,
………..रावांच्या घराला, लागलाय अखेर वारसा
घरट्यात चिव-चिव करते पाखरू,
………..रावांच्या घरात आले एक वासरू
रोज मातीस, या ओढ आभाळाची,
……….भेटली संगत, तान्ह्या बाळाची
शेगाव चे गजानन, शिर्डी चे साई,
…….रावांचे नाव घेते ……ची आई
गोडगोजिरे रूप, इवले – इवले डोळे,
…….च्या हास्याने घर आमचे खुलले
चांदीचे वाळे घातले ……. च्या पायात,
…….चे नाव घेते नातेवाईकांच्या मेळाव्यात
बगळ्यांची माळ उंच विहरते आकाशी,
……..च नाव घेते, बारशाच्या दिवशी
अशाच नवनवीन पोस्ट वाचण्यासाठी suvicharguru.com या वेबसाईट अवश्य भेट द्या. धन्यवाद …!