Dohale ukhane for male | 200+dohale ukhane (पुरुषांसाठी डोहाळे जेवण उखाणे मराठीमध्ये)

Dohale Jevan Ukhane

Dohale ukhane for male

Dohale ukhane for male : नमस्कार मित्रांनो, उखाणे म्हटल की काय नाव घेऊ असा प्रश्न सर्वांनाच पडतो म्हणजे लग्न झालेल्या स्त्री ला आणि पुरुषाला. उखाणा आपण कधी घेतो, जेव्हा लग्न कार्य असेल,किंवा घरामध्ये एखादी पूजा असेल किंवा कोणता सण, अगदी घरात कसलाही कार्यक्रम असेल तेव्हा उखाणा घेतला जातो. तसेच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असेल तेव्हा मुलाचे किंवा मुलीचे होणारे आई बाबा उखाणा घेतात. बाळाची आई तर आवर्जुन उखाणा घेतेच पण बाळाचे बाबा पण उखाणा घेतात. तुम्हाला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी उखाणे हवे असतील तर तुम्ही या ब्लॉग मधून डाऊनलोड करू शकता .या ब्लॉग मध्ये खास बाळाच्या बाबांसाठी (dohale ukhane for male,Dohale ukhane for male in marathi, dohale ukhane)उखाणे दिलेले आहेत.

तुम्हाला अथवा तुमच्या मित्र मैत्रिणींना डोहाळे जेवणाचे उखाणे तुम्ही सांगू शकता. बाळाच्या आई-वडिलांचा हा अतिशय आनंदाचा क्षण असतो त्यामुळ सर्वांच लक्ष त्यांच्याकडेच वेधलेलं असत. त्यामुळे सर्वांच्या आग्रहाखातीर त्यांना उखाणा घ्यावाच लागतो.

Dohale ukhane for male
Dohale ukhane for male

आंबा गोड, ऊस गोड,त्याहीपेक्षा अमृत गोड, डोहाळे जेवणाला जाहीर करतो,
……..च नाव आहे अमृता पेक्षाही गोड

Dohale ukhane for male
Dohale ukhane for male in marathi

काट्यात काटा गुलाबाचा काटा,
…..च नाव घेतो डोहाळे जेवणाला गुलाबजाम खाता खाता

Dohale ukhane for male
Dohale ukhane for male

केसर दुधात टाकले काजू,बदाम,जायफळ
……….च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी वेळ न घालवता वायफळ

Read More : Chavat ukhane in marathi

Dohale ukhane for male
Dohale ukhane

डोहाळे जेवणाचा दिवस आहे आमच्याकरिता खास,
….. ला देतो गुलाबजाम चा घास

Dohale ukhane for male
Dohale ukhane

पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…….वर जडली माझी प्रीती आणि तिचे फळ मिळतेय डोहाळे जेवणाच्या दिवशी

Dohale ukhane for male
Dohale ukhane

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, लग्न असो वा डोहाळे जेवण
………….. च नाव येतं हृदयातून

Dohale ukhane 
Dohale ukhane for male

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
……च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी, ऐका देवून कान

Dohale ukhane 
Dohale ukhane 

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, डोहाळे जेवणाला माझी
…….म्हणते मधुर गाणी

Dohale ukhane 
Dohale ukhane 

…….माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला
डोहाळे जेवणाचा दिवस स्पेशल

कळी हसेल,फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध
……. च्या सोबतीत, डोहाळे जेवणाच्या दिवशी गवसला जीवनाचा आनंद

मावळला सूर्य आणि चंद्र उगवला आकाशी
………च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या खास दिवशी

डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका
……..च नाव घेतो लक्ष देवून ऐका

Dohale ukhane for male
Dohale ukhane for male

तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले
..….च नाव आहे गोड, पुरवा……चे डोहाळे

मावळला सूर्य, उगवला शशी,
……च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी

चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ
.…..च नाव घेतो केला डोहाळे जेवणाचा थाट

रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
..…. ला अन् मला येणाऱ्या बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा

बाळराजांची चाहूल दरवळला परिसर,
..…..च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

……. आहे प्रेग्नंट देतो मी तुला फुल,
प्रॉमिस करतो आज तुला, डॅडी होईन मी कूल

कितीही झाला बिझनेसमध्ये तोटा
…..च नाव घेतो तरीही उडवल्या डोहाळे जेवणात 100 च्या नोटा

सिव्हिल इंजिनिअर बनायला लागले खूप कष्ट
…….च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी स्पष्ट

नटण्यासाठी बायका कायम असतात हौशी,
…….च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी

गणपती बाप्पाला केला होता नवस
…..च नाव घेतो साजरा करतोय आज डोहाळे जेवणाचा दिवस

आनंदाचे कारंजे अन ही मंद हवा,
……. च नाव घेतो आता होणार मी बाबा

या सुंदर क्षणी मन भारावून गेले,
……….च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी सतराशे साठ गिफ्ट्स आले

गोड माझी बायको जशी हिऱ्यांची खान,
………..च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी दिसते खूप छान

जशी राधा-कृष्णाची जोडी, तशी नात्यात हवी गोडी
…….च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी दिसते झक्कास आमची जोडी

आनंद झाला, वाटू पेढे आणि बर्फी
………च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी

……….ने नेसली हिरवी साडी आणि घातला हिरवा चुडा,
डोहाळे जेवणाच्या दिवशी वाटतो मी सर्वांना कंदी पेढा

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात
……..च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी सोन्याचा हार घातला ………..गळ्यात

………माझी राणी, डोळ्यांवर सरली बट
………….च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी देतो तिला सोन्याची नथ

दिवाळीत दिली हिला पैठणी साडी,
………..च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी दिसती झक्कास आमची जोडी

सोनार दाखवतो सोन्याची कला,
……..च नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी हीच माझी चंद्रकला

धन्यवाद! तुम्हाला असेच नव नवीन ब्लॉग पहायला मिळतील. अवश्य तुम्ही आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

Treading

More Posts