Fake love quotes in marathi | 100+खोट्या नात्यांचे कटू सत्य-फेक लव्ह कोट्स २०२५
Fake love quotes in marathi
Fake love quotes in marathi : नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात नाती अधिक रंगीबेरंगी दिसतात, पण त्यामागचं सत्य अनेकदा वेगळंच असतं. प्रेम म्हटलं की त्यात प्रामाणिकपणा, विश्वास आणि समर्पण अपेक्षित असतं, मात्र खोट्या नात्यांमध्ये हे सगळं फक्त दिखावा असतो. अशा नात्यांमध्ये सुरुवातीला गोड बोलणं, काळजी घेण्याचं नाटक आणि स्वप्नं दाखवणं दिसतं, पण कालांतराने त्यामागचं फसवणुकीचं वास्तव समोर येतं.
फेक लव्ह म्हणजेच बनावट प्रेम (Fake love quotes in marathi) आपल्याला आयुष्यात कटू धडे शिकवतं. ते आपल्याला खरी आणि खोटी माणसं ओळखायला मदत करतं. जरी खोट्या नात्यांमुळे मन दुखतं, तरी त्यातून मिळालेला अनुभव पुढील प्रवासात उपयोगी पडतो.
या लेखात आपण (Fake love quotes in marathi) फेक लव्ह कोट्सच्या माध्यमातून खोट्या नात्यांचं वास्तव, त्यांची वेदना आणि त्यातून शिकण्यासारख्या गोष्टी जाणून घेऊ.

हिम्मत लागते समोरचा आपल्यावर,
प्रेम करत नसताना सुद्धा आपण
त्याच्यावर प्रेम करायला.
असे वाटून तिच्या प्रत्येक
शब्दावर विश्वास ठेवला होता,
की एवढे सुंदर ओठ खोट
कसे बोलू शकतील.
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,
कारण त्यात तुझ्या खऱ्या प्रेमाची जाणीव असते.
परिस्थितीने लढायला शिकवलं म्हणून,
मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय.
बंद डोळ्यांनी कोणाची आठवण करायची
मजा काही वेगळीच असते.
कोणावरही इतकंही प्रेम करू नका की,
स्वतःवर पण प्रेम करायला विसराल.
अधिक वाचा : Navara Bayko Jokes In Marathi
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
डियर स्वीट हार्ट, तुझ्यासोबत पण तुझाच होतो,
आणि तुझ्याशिवाय पण तुझाच राहील.
माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही,
एकटा राहिला की हरवतो,
मार्ग सरळ होता मी वळण बदलत राहिले.
प्रत्येकाच्या मनाचा मी खूप विचार केला,
माझ्या मनाचा विचार करणार कोणीच नव्हतं,
आपलेच लोक मला एकटा टाकून गेली तेव्हा
रडायलाही माझ्या डोळ्यात पाणीच नव्हतं.
ओळखीचा वाटला वाट तू बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता, पण मला टाळून गेलास.

प्रेम कधीच चुकीच नसतं,
चुकीची असते ती आपली निवड.
माझ्या अगोदर हे तुझं कोणीतरी होतं,
आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे.
किती फरक पडतो ना माणसांत
लहानपणी खेळणी तुटल्यावर,
रडणार पोरं मोठेपणी स्वप्न
तुटल्यावर सुद्धा हसत हसत वावरत.
दुःखात आनंद शोधताना चूक विसरू नकोस,
दुसऱ्याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरू नकोस
आयुष्यात सुखी होण्यासाठी दुसऱ्याला दुःख देऊ नकोस.
प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं,
मी तिच्यावर, आणि तिने खूप जणांवर.
ठाऊक आहे मला मी नसताना तु रडशील,
एकदा का होईना आठवण माझी काढशील ना.
तुझ्यासोबतच्या त्या क्षणांना आता विसरू कसे,
जाते म्हणतेस,पण तूच सांग मी स्वतः ला सावरू कसे.
या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा,
लपण्यासारखा तुझ्या प्रेमात मला
मिळाला एक विरह जपण्यासारखा.
एवढ्या दिवसांचे नातं तू,
इतक्या लवकर विसरून जाशील
असं कधीच वाटलं नव्हतं मला.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते.
ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलीय,
तीच व्यक्ती नेहमी इतरांना हसू शकते कारण
हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणाला ठाऊक नसते.
जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली.
तिला जायचं होतं ती गेली मला गमवायचं होतं,
मी गमावलं फरक फक्त एवढाच तिने जीवनाचा
एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन.
का विसराव मी तिला का विसराव,
तिने मला जिने माझ्या कवी मनाला
आपल्या प्रेमातून जन्म दिला.
पुस्तकात लिहिले आहे की, नियम तोडू नये
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे तेव्हा
कोणी का नाही लिहिले की कोणाचे हृदय तोडू नये.
तुला स्मरताना माझे डोळेही चिंब भिजले होते,
ओलावल्या पापण्यांनी ते तुझ्याशी बोलत होते.
माझ्या मनाशी होणारा संवाद ही आता मी टाळतो,
आजकाल माझ्याशीच मी मूक होऊन वागतो.
काय हवं होतं तिला, मला कळलंच नाही,
घेऊन गेली हृदय, पुढचं मला माहीतच नाही.
हृदयात येण्याचा रस्ता असतो,
पण बाहेर पण जाताना हृदय तोडून जातात
जाण्याचा नसतो म्हणून लोक हृदयात येतात.

खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेल,
असताना समोरच्याला I Am Fine म्हणणं.
मनातले त्याला कळले असते,
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोडता जोडता जग सोडावे लागले नसते.
काही नसतं आपल्या हातात,
परिस्थितीच असते छळत
मन ही जात मरून मग
अश्रु सुद्धा ही नाही गळत.
बंदुकीतून सुटलेली गोळी मी
थांबवून दाखवू शकतो,
पण फक्त एकदाच….
आज ज्या व्यक्तीची कमी भासते,
त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये.
अगोदर तो मनापासून बोलायचा,
आणि आता गरजेनुसार बोलतो.
परिस्थितीने लढायला शिकवलं,
म्हणूनच मी लढतोय
उद्याच्या सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय.
स्वप्नात कुणाला असेही बघू नये की,
आधाराला त्याचे हात असावे तुटले जर
स्वप्नाचानक हातात आपल्या काहीच नसावे.
तू माझ्या काळजात सामावून गेलास सुद्धा,
मी वेड्यापरी तुझ्या मनाच दार शोधत राहिले.
माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली,
तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली.
तुझा अनोखीपणा ही आता,
ओळखीचा वाटायला लागला आहे
अनोळखी तू असलीस तरीही तो
माझ्या ओळखीचा झाला आहे.