Marathi Ukhane For Bride | 70+नवरीसाठी मराठी उखाणे
Marathi Ukhane For Bride
Marathi Ukhane For Bride: नमस्कार मित्रांनो, जुन्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही देखील आपण लग्न समारंभामध्ये पाहतो ती म्हणजे उखाणा घेणे. वेगवेगळ्या प्रकारे उखाणे घेतले जातात काही मोठे असतात तर काही एकदम छोटे असतात. उखाणे हे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील घेतले जातात जसे की सत्यनारायण पूजेला, गृहप्रवेश करताना, नवीन लग्न झाल्यावर, अशा अनेक कार्यक्रमांमध्ये उखाणा घेतला जातो. तर असेच नवनवीन उखाणे नवरीसाठी दिलेले आहेत.ते तुम्ही या पोस्ट मध्ये पाहू शकता. (Marathi Ukhane For Bride).

आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा,
…….रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा.
सासरची छाया माहेरची माया,
……. राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया.
सर्वांपुढे नमस्कार साठी जोडते दोन्ही हात,
…….राव चे नाव घेते पण सोडा माझी वाट.
आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम,
…….. राव सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम.
विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची,
………रावांचे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची.
काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून,
………रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
अधिक वाचा : वाढदिवस आभार शुभेच्छा मराठीमध्ये
मंदिरात वाहते फुल आणि पान,
……. रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान.
छान छान बांगड्या, छुम छुम पैंजण,
……..रावांचे नाव घेते ऐका सारेजण.
कळत नाही माझेच मला आहे स्वप्न की भास,
…….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
प्रत्येक कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून,
……. रावांचे नाव घ्यायला सुरवात केली आजपासून.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
…….. रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

गोकुळाच्या कुंजवणात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
……… रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी.
नव्या नव्या आयुष्याची नवीन नवीन गाणी,
……… राव माझा राजा मी त्याची राणी.
सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी,
नवरीच्या गळ्यात नाजूकशी सरी,
मोठ्यांने बोलते नका टव कारू कान,
……. रावांचे नाव घेते राखून तुमच्या मान.
Marathi Ukhane For Bride: नवरीसाठी खास मराठी उखाणे

मित्रांच्या निरंजनात प्रीतीची लावते वात,
…….. बरोबर संसाराला करते सुरुवात.
गुळाची गोडी आणि फुलांच्या सुगंध,
…….. राहू दे संसारात आणिल स्वर्गाचा आनंद.
लग्न लागले घातले मंगळसूत्र,
……. रावण सोबत सुरू झाले नवे सत्र.
चांदीची जोडवी लग्नाची खुण,
……. रावांचे नाव घेते कामटकरांची सून.
लग्न झाले आता आमची बहरू दे संसारवेल,
…….. च नाव घेते वाजवून पवारांच्या घराची बेल.
सर्वांपुढे नमस्कार साठी जोडते दोन्ही हात,
……… रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
…….. राव चे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण.
उंबरठ्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल,
……. रावांचे जीवनात टाकले मी आज पहिले पाऊल.
लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा,
…….. राव मुळे पडला जीवनात प्रेमाचा सडा.
चंदनासारखे झिजावे, उदबत्ती सारखे जळावे,
……. रावांना औक्ष मिळो हे देवा पाशी मागावे.
महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले,
……..रावांच्या जीवना साठी आई-वडील सोडले.
सासरला जाताना सोडाव लागते माहेर,
……… राव जीवनात मला प्रतीचे आहेर.
हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला,
………राव चे नाव घ्यायला मानपान कशाला.

हिंदुस्तान देशात सोन, चांदी, हिरे, मोती महागले,
…… राव सारखे रत्न हाती लागले,
सासू माझी मायाळू दीर आहेत हौशी,
…….. राव चे नाव घेते, लग्नाच्या दिवशी.
दारी होती तुळस तिला घातले होते पाणी,
आधी होते आई-बाबांची तानी आता झाले …….ची राणी.
मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर,
…….. रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे.
गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,
…….. रावांचे नाव घेते आहे मी दंग.
चंदनाच्या झाडाखाली हरीने घेते विसावा,
…….. रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा.
तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशीर्वाद,
माहेरचे निरंजन आणि सासरची फुलवात,
……. रावांचे नाव घेऊन करते मी संसाराला सुरुवात.
विजयाचे तोरण उभारले चैत्र प्रतिपदेच्या दिनी,
……… रावांनी घातले मंगळसूत्र झाले मी सुवासिनी.
सौख्य प्राप्तीसाठी धरावी उद्योगाची कांस,
साऱ्यांच्या आग्रहास्तव घालते ….. ना जिलबीचा घास.
वसंताच्या आगमनाला कोकिळेची साद,
……. च्या संसारात यावा सौख्याचा नाद.
कर्तव्याच्या तारका चमकतात आपत्तीच्या ढगात,
…..….. ची गृहलक्ष्मी होऊन आले नव्या घरात.
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
….. रावांचं नाव घेताना कसला आला आळस.
पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
…… रावांचे नाव घेताना आशीर्वाद मागते.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
…… रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
….. रावांचे नाव घेऊन उखाणा करते पुरा.
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवीगार,
…….. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्रांचा हार.
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
….. राव हेच माझे अलंकार खरे.
सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान,
…… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.