Navra Bayko Jokes In Marathi|100+नवरा बायको भन्नाट जोक्स मराठीमध्ये

Navra Bayko Jokes In Marathi

Navra Bayko Jokes In Marathi

Navra Bayko Jokes In Marathi : नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण काही नवरा बायको भन्नाट जोक्स मराठीमध्ये लिहिलेले आहेत. हे भन्नाट जोक्स केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर जेव्हा कधी आपण उदास असू, आपले मन कशात लागत नसेल तर हे वाचून नकळत तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल त्यासाठी हे नवरा बायको भन्नाट जोक्स मी या लेखांमध्ये लिहिलेले आहेत.

हे जोक्स केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर इतर कोणीही असो त्यांना तुम्ही आनंदी ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी त्यांना शेअर करू शकता.

नवीन लग्न झालेल जोडपं भाजी आणायला जातं..
भाजीवाला विचारतो -मॅडम खूप शिकलेले आहेत वाटतं
नवरा- (खुश होऊन)हो, इंजिनियर आहे ती, तुम्हाला कसं कळलं?
भाजीवाला- त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमॅटो आणि वरती
कलिंगड ठेवले म्हणून अंदाज लावला.

Navra Bayko Jokes In Marathi
Navra Bayko Jokes In Marathi

जर डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन म्हणतात
तसं… नर्सच्या नवऱ्याला नरसाळा म्हटलं तर चालेल का…
सांगा तुम्हीच…..

बायको -परत दारू पिऊन आलात, टाईम बघा काय झालाय?
नवरा – बाराला पाच कमी.
बायको -अजून डोसा दारू,..
रात्रीचे नऊ वाजलेत आणि तुम्ही म्हणताय बाराला पाच कमी.
नवरा- मग बाराला पाच कमी म्हणजे किती झाले?..

अधिक वाचा : Attitude Marathi Tomne In Marathi

मी सकाळी टीव्ही बघत होतो,,,,
मध्ये जरा पाणी प्यायला काय गेलो,
तर लगेच गुंड हीरोइन ला घेऊन गेले राव…
असं कुठे असतं का…?

ती- बाबू, माझा रिचार्ज संपलाय तू करतोस का..?
मी- हे बघ, लग्नाच्या आधी तसले काही नाही.

चीनची युवा पोरं Ai Tools बनवत आहेत,,,
अमेरिकेची युवा पोरं Chatgpt सारखे AI Tools बनवत आहेत,,
आणि आपल्या देशातली पोरं सैयारा मूवी बघून थिएटरमध्ये रडत आहेत…

बँक बॅलन्स बघितला की वाटतं ते
जगबुडी होणार होती त्याचं काय झालं….

घरात कोणता पण विषय चालू असू द्या,,,
तो घुमून फिरून मी आणि माझ्या मोबाईलवर येतो,,….

जी मुल गर्लफ्रेंड च्या लग्नाला जाऊन पोटभर जेवून येतात,,,
ती मूल आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा लोड घेत नसतात….

जे लोक घराला कुलूप लावल्यानंतर ओढून बघतात,,,,
ते लोक कधीच कोणावर विश्वास ठेवू शकत नाही,….

सासरवाडी कडून फोन आला..
जावईबापू उद्या तुमच्या मेहुण्यासाठी मुलगी
बघायला जायचं आहे तुम्ही येऊन जा,,,
जावई – मुलगी तुमच्या हिशोबाने बघा,,
बुवा येथे माझाच डिसिजन चुकलाय.

Navra Bayko Jokes In Marathi
Navra Bayko Jokes In Marathi

नातेवाईक- तुमचा मुलगा काय करतो,,,,
आई – Athlete आहे स्वतःच्या करिअर सोबत खेळतो…

वकील – हत्तेच्या रात्री तुमच्या पतीचे अंतिम शब्द
पती – माझा चष्मा कुठे आहे नीलिमा?
वकील – मग यात ठार मारण्यासारखे काय गोष्ट होती?
पत्नी – पण माझं नाव मीनल आहे.

कॉलेजमधल्या मैत्रिणीचा DP झूम करून बघत होतो,,,,,,
तेवढ्यात पाठीमागून बायकोचा आवाज आला राहू द्या
याच्यापेक्षा जास्त जवळ नाही येणार ती….

मित्रा, जेवढा इंस्टाग्राम चालवतोस ना,,,,
तेवढी बस चालवली असती,
तर तू आज हिरा ठाकूर सारखा
ट्रॅव्हल कंपनीचा मालक असता…

ती आज दिसली बाजारात अगदी आजही तशीच…
चंद्रासारखी! फरक इतकाच सोबत 2 उपग्रह
आणि 1 बिथरलेला धूमकेतू होता………

पोलीस- बाई तुमचा नवरा कसा मेला?
बायको- विष खाऊन
पोलीस- मग त्याच्या अंगावर या मारलेल्या जखमा कशा काय?
बायको- खातच नव्हता..

नोकरी लागण्याआधी विचार करायचो,,,
20000 पगार भेटल्यावर दर महिन्याला
नवीन नवीन वस्तू विकत घेईन…
आता तर नवीन वस्तू सोडा साधी
चड्डी घ्यायला पण पैसे शिल्लक राहत नाही…..

Navra Bayko Jokes In Marathi
Navra Bayko Jokes In Marathi

बायको- अहो ऐकलं का आपले लग्न
लावून देणारे भटजी वारले,,,
नवरा- एक ना एक दिवस त्याला त्याच्या

कर्माचे फळ मिळणारच होते..

कटू सत्य…!!
तुम्ही नदीमध्ये जाऊन कितीही पाप धुवा..
पिण्याच्या पाईपलाईन मधून ते

पुन्हा तुमच्या घरात येणारच,,,
महानगरपालिका..!!

आजच्या जमान्यात कोणाकडे एक किडनी नसेल
तर माणूस जिवंत राहू शकतो,,,
पण मोबाईल नसेल तर बाई जीवच जाईल,,
आणि परत त्यात Recharge नसेल तर

भाईसाहब लोक पागल होतील,,,
माझ्यासारखे….

बायको- अहो, रक्षाबंधन झाली आता मला न्यायला या,,,
नवरा- 15 ऑगस्ट पर्यंत सुट्टी आहे,,,
दोन चार दिवस अजून माहेरी रहा..
बायको- जास्त हुशार बनू नका,,
देश स्वतंत्र झालाय तुम्ही नाही…

आमच्या नात्याला नाव काय देऊ,,,,
मग आठवलं,
तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना…

बरोबर ना सुनांनो,,,,,
सासूबाई सगळं काही सहन करू शकते,
पण दुपारी झोपलेला सुनेला कधीच सहन करू शकत नाही,,,,
लगेच भांड्यांचा आवाज येतो…

श्रावण तर कोणी पण पाळू शकतं,,,,
एक महिना इंस्टाग्राम, फेसबुक
whatsapp पाळून दाखवा……

सर- दळणवळण म्हणजे काय?
गण्या- एखादी मुलगी दळण घेऊन जाताना,
वळून पाहते तिला दळणवळण असे म्हणतात….

मनात विचार आला होता,,,,
एक हेलिकॉप्टर घ्यावं, पण नंतर वाटलं नकोच,,,,
पुन्हा नातेवाईक टोमणे मारतील की,
घराबाहेरून गेला पण हात नाही केला…
मुलींचा अर्धा रविवार तर हाच विचार करण्यात जात असेल,,,,,,
आज केस धुवायचे की कपडे धुवायचे…

नवरा म्हणजे काय,,,,,
बायको रुसल्यावर तिला मनवायच्या ऐवजी स्वतः तोंड
फुगून बसणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात….
बरोबर आहे ना बायकांनो…

चांगला नवरा सगळ्यांनाच मिळतो,,,,
पण त्याची पारख फक्त शेजारणीलाच असते,
बायकोला नाही…….

Treading

More Posts