Rakshabandhan |Rakshabandhan 2024 – रक्षाबंधन(राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा)
Rakshabandhan
Rakshabandhan: नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधन हा आपला मराठी सण आहे. रक्षाबंधनाला नारळी पोर्णिमा असेही म्हणतात. श्रावण महिना चालू झाला की शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हा रक्षाबंधनाचा सण येतो. या वर्षी 19 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन साजरी करण्याची वेळ 18 ऑगस्ट रात्री ०3:०4 मिनिटाने सुरु होईल व 19 ऑगस्ट रात्री 11.55 मिनिटाने समाप्त होईल. भाऊ – बहिणीचं अतूट प्रेमाचं नात बांधून ठेवणारा धागा असतो तो म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते, त्याला ओवाळते, पेढा खाऊ घालते तसेच भावाला गिफ्ट देखील देते. राखी हे बहिण- भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतिक आहे.
रक्षाबंधनाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. भावाने आपल्या बहिणीच संरक्षण करण्यासाठी हा सण असतो तो म्हणजे राखी पौर्णिमेच्या सण. खरं तर राखी पौर्णिमेची पूर्वीची एक कथा आहे…तेव्हा पासून आजपर्यंत सगळेजण हा स अतिशय आनंदाने साजरा करतात. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या माहेरी जाते. भावाला ओवाळते त्याच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करते. बहीण – भावाच प्रतीक म्हणजे रक्षाबंधन.
Rakshabandhan Wishes in marathi
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
रक्षाबंधन……
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा
तुम्हाला आज आहे
बहिण – भावाचा पवित्र सण
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हे बंध स्नेहाचे,
हे बंध रक्षणाचे
राखी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा…
रक्षाबंधन ..
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
नातं रक्ताचं असो वा मानलेलं..
कुठल्याही नात्यात
नसेल एवढी ओढ
म्हणुनच भाऊ-बहिणीच हे
नातं खूप खूप गोड आहे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनात रक्षणाचे बंधन देऊन,
तू झालास माझा भाऊ
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवा भावाचा प्रेमळ भाऊ
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
अधिक वाचा : Good morning motivational quotes in marathi
Rakshabandhan 2024 | राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बंध प्रेमाचा बंध निरागस नात्याचा
बंध एकमेकांवर दाखविलेल्या विश्वासाचा,
भाऊ – बहिण हे गोड नाते जपण्याचा
असा आहे हा सण रक्षाबंधनाचा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे,
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे,
राखी शिवाय दुसर काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वाचन मागते तुझ्याकडे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बंधनाची गाथा, भावाच्या अनमोल जोडीची
रक्षा बंधनाच्या आभाळात सुरु होणारी आपल्या
प्रेमळ भावांची कथा….
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
राखीचे नाते लाखमोलाचे,
बंधन आहे बहिण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा ….
सूर्यासारखे चमकत राहा
फुलांसारखा सुगंधित राहा
सदैव आनंदी रहा,
हीच आज या बहिणीची प्रार्थना
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हे बंध अनोखे असतातच,
पण गाठीविनाही घट्ट राहतील
राखी तर निमित्त असते
त्या पलीकडे हे नाते अतूट राहिल…
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
सगळा आनंद, सगळ सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
यशाची सगळी शिखर,
सगळ ऐश्वर्य हे तुला मिळू दे
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला,
एक नवा उजाळा देऊ दे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहिण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
काही नाती आयुष्यात खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलच तर त्याला आधी मी सामोरे जाईल
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा,
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा दादा
तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा
हीच बहिणीची परमेश्वराकडे इच्छा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
डोळ्यात थोडं का होईना पाणी आणतोच
ते भावा बहिणीचे भांडण, हक्काने मागून
घेतलेले गिफ्ट आणि मायेने आणलेली राखी
आत्ता कधी जमत तर कधी जमत नाही
पण आपल नात तसच आहे,
अंतर वाढल पण प्रेम कधी कमी नाही झाल
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रश्नमंजुषा :
1.रक्षाबंधनाची डेट आणि वेळ काय आहे ?
उत्तर : या वर्षी 19 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन साजरी करण्याची वेळ 18 ऑगस्ट रात्री ०3:०4 मिनिटाने सुरु होईल व 19 ऑगस्ट रात्री 11.55 मिनिटाने समाप्त होईल
२. रक्षाबंधन या सणाचे दुसरे नाव काय आहे ?
उत्तर : रक्षाबंधनाला नारळी पोर्णिमा असेही म्हणतात.
3. पत्नी आपल्या पतीला राखी बांधू शकते का ?
उत्तर : हो, बांधू शकते. कारण राखी एक केवळ धागा नाही तर प्रेम,आपुलकी,काळजी या सर्वांच प्रतिक आहे.पतीही आपल्या पत्नीची रक्षा करत असतो त्यामुळे पत्नीने पतीला राखी बांधली तरी चालेल.