Self attitude quotes in marathi for girl |80+मुलींसाठी रुबाबदार कोट्स
Self attitude quotes in marathi for girl
Self attitude quotes in marathi for girl: नमस्कार मित्रांनो, आपण म्हणतो ना की स्वतःमध्ये एक आत्मविश्वास पाहिजे तोच आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो जसं की मनोबल वाढवण्यासाठी काही आपण पुस्तके वाचतो, तसेच काही सुविचार देखील वाचत असतो. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो. आज आपण पाहिलं तर प्रत्येकाला स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी स्वतःच मनोबल वाढविणे गरजेचे आहे. मुली असो किंवा मुले असो प्रत्येकालाच आपले मनोबल वाढवण्याची आवश्यकता असते. तर यासाठीच या पोस्टमध्ये self attitude quotes in Marathi for girls इथे दिलेले आहे ते तुम्ही वाचून स्वतः पॉझिटिव्ह राहून आपले मनोबल देखील वाढवू शकता.

तो विषय तिथेच सोडून द्या,
जिथे स्वतःला फक्त त्रास मिळतो.
तुझा घमंड तुला रडवणार,
आम्ही काय होतो ते वेळच सांगणार.
कधी वेळ चुकीची येते,
तर कधी आयुष्यात माणसं चुकीचे येतात,
पण आपण मात्र स्व:तासाठी जगायला हवं…
जे लोकं आपल्याशिवाय राहू शकतात,
मग आपणच का त्यांच्यासाठी रडायचं,
झुरायचं, मरायचं, गेलं उडत……
एखाद्यावर गरजेपेक्षा जास्त प्रेम केलं ना,
ते माणसाला भिकारी बनवल्याशिवाय राहत नाही…
विषय फक्त वेळेचा आहे,
खेळ त्यांचा पण होणार,
ज्यांनी आमचा केला आहे.
अधिक वाचा : Self Motivational Quotes In Marathi
माणसं कमवायला निघालो होतो,
नंतर समजलं पैसा असेल तरच
“माणसे” जवळ येतात.
खोटं बोलणारा तू, तुझी
नजर कधीच चुकली नाही,
आणि खरं राहणारी मी,
माझं मात्र आयुष्य उध्वस्त झालं.
चुकीला माफी असावी, पण विश्वासघात
करणाऱ्यांची आयुष्यात पुन्हा भेट नसावी…
जे आपल्या हिशोबात बसत नाही,
त्याचा आपण विचार करायचा नाही,
मग ते वस्तू असो की माणसं…..

बदलणारी लोक कधीच आपली नसतात,
त्यांचा “स्वार्थ” संपला की ते परकी होतातच…
तुटलेल्या मनाचे तुकडे गोळा करायचे,
आठवणींचा पसारा आवरायचा आणि
खूप दूरवर निघून जायचं…..
आपण आपल्या प्रेमावर घमंड करू नये,
कारण मी कितीतरी वर्षांचा प्रेम पाच
मिनिटांमध्ये बदलताना बघितले आहे….
तुझा खरा चेहरा ओळखायला खूप वेळ लागला,
कारण तू नाटकचं एवढ छान केलेलं..
त्याच नात्यात अडकून रहा,ज्यात
जपण्याची तुमच्यात ताकद असेल
कोणाचा आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ नाही,
तुमच्या मूड नुसार खेळायला…
इमानदारी रक्त तसावी लागते, उगाच खऱ्याची
चादर पांघरून कोण खरं होत नाही……
लाखात एक वाक्य,,,
जेव्हा गरज असते तेव्हा प्रत्येकाची भाषा गोड असते.
काही लोकांचा हिशोब असा करायचा आहे,
की ना नाव बघायचं ना नाती….
परिस्थितीने आणि आपलेपणाचे,
ढोंग करणाऱ्या नात्यामुळे
समजलं मला खचून न जाता
ठामपणे किती महत्त्वाचा आहे.

हिशोब कर्मांचा होतो, भक्तीचा नाही, नाहीतर
रावण सुद्धा महादेवाचा परमभक्त होता…
लय पळत होतं दुसऱ्यांसाठी,
आता आलेत का कोण तुझ्या मदतीसाठी…
मला बदला घ्यायचाच नाही…
जिथे तुम्ही माझ्यासारखी व्यक्ती कायमची गमावली,
तिथेच माझा बदला पूर्ण झाला….
मी सर्व खोट्या नात्यांचा दहावा घातलेला आहे…
वाईट परिस्थिती आणि एकटेपणा,
माणसाला खूप काही शिकवतो….
आपल्याला वेड्यात काढून,
दुसऱ्याच्या मिठीत खुश असावी,
अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसावी..
वाईट वेळ म्हणजे लोकांची खरी ओळख….
कोणाला किती जीव लावला,
तरी शेवटी आपण परकेच….
नातं सुखावणार असावं पण,
तू तर मला फक्त दुखवत आलास…
किती त्रास झाला तरी गप्प बसा, कारण
कोणाला जबरदस्तीने आपलं बनवता येत नाही…
आयुष्यात झालेली सर्वात मोठी चूक म्हणजे
स्वार्थी व्यक्तीवर केलेलं खरं प्रेम.
आज किंमत नाहीये ना आमची, पण एक वेळ,
अशी येणार तेव्हा सगळं आठवणार आम्ही
किती काय काय सहन केलं तुमच्यासाठी…
प्रेम, वेळ, आपुलकी या गोष्टी मागून मिळत नाही,
त्यासाठी त्या व्यक्तीच्या मनामध्ये तेवढा
आदर पाहिजे तेव्हाच मिळतात…..
दुःख हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतं,
पण लोकांसमोर हसायला विसरायचं नसतं.
सहन करणारे लोक दुःख
कोणालाही सांगत नाहीत,
त्यामुळे त्यांचे मन आणि
शरीर सारखं आजारी असतं.

ज्यांच्याकडे ऑप्शन्स असतात ना त्यांना,
एक कोणी असल्या नसल्याचा काहीच फरक पडत नाही..
जिथे आपल्या शब्दांना काहीच किंमत नसते,
तिथे हक्क दाखवून काहीच फायदा नसतो..
समजूतदार व्यक्तीच आयुष्य नेहमी,
समजून घेण्यातच निघून जाते..
गरज संपल्यावर लोक देवाला सुद्धा विसरतात,
आपण तर माणसं आहोत..
ज्यांना फक्त स्वतःच दुःख आणि सुख दिसतं,
त्यांना दुसऱ्यांच्या दुःखावर कधीच फुंकर घालता येत नाही..
जितक्या वेदना तुम्ही एखाद्याला द्याल तेवढेच,
समोरची व्यक्ती कठोर आणि मजबूत बनते..
ते नाते आता तिथे सोडून द्या, जिथे दुसऱ्यांना
खुश ठेवण्यासाठी तुम्हाला वेदना दिल्या जातात..
एखाद्याचा आयुष्य उध्वस्त करून देवाचे स्टेटस ठेवतात लोक,
काय, देवाला पण फसवाल असं वाटतंय,
कर्म फिरून येणारच राव किती ही देव-देव करा..







