Swami Samarath Quotes in marathi | 500+श्री स्वामी समर्थ कोट्स

Swami Samarath Quotes in marathi

Swami Samarath Quotes in marathi

Swami Samarath Quotes in marathi: नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे ब्रम्हांडनायक आहेत, श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचीती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की. त्यासाठीच इथे Swami samarth quotes in marathi, Swami samarth status देलेले आहेत ते तुम्ही आपल्या मित्र परिवाराला तसेच नातेवाईकांना पाठवू शकता. Swami samarth quotes in marathi तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Swami Samarath Quotes in marathi
Swami Samarath Quotes in marathi

भितोस कशाला मी आहे ना;
फक्त निसंकोचपणे माझ नाव घे
– श्री स्वामी समर्थ

दशा झालेल्या जीवनाला,
दिशा दाखवणारा गुरू म्हणजेच
श्री स्वामी समर्थ महाराज.
– श्री स्वामी समर्थ

श्रध्दा सगळ्यांवर पण विश्वास,
फक्त माझ्या स्वामींवर.
– श्री स्वामी समर्थ

मनात ठेऊन सर्व काही
सहन केलं आहे,
ह्याच विश्वासावर की कधी तरी
माझ्या मनासारखं पण होईल
– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे,
ते चांगल्यासाठीच…
– श्री स्वामी समर्थ

Read More : Heart touching sad quotes in marathi

जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते,
देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही.
– श्री स्वामी समर्थ

जिथे विश्वास असेल तिथे,
पुराव्यांची गरज लागत नाही,
मग ती भक्ती असो वा व्यक्ती.
– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात…
भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत,
परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात.
– श्री स्वामी समर्थ

चांगल्या वेळेचा अहंकार हा,
नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो.
– श्री स्वामी समर्थ

माणसाची बोलण्याची पद्दत सुध्दा,
माणसाची सुंदरता दाखवते.
– श्री स्वामी समर्थ

नशिबात नाही म्हणून आयुष्यभर
दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल,
हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला
– श्री स्वामी समर्थ

स्वामी सांगतात,
नाती टिकवण आज काल

अगरबत्ती सारखं झालंय,
स्वतः जळून जायचं पण

दुसऱ्याला सुगंध देत राहायचं.
– श्री स्वामी समर्थ

तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार,
तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी,
तुझ्या पाठीशी मी उभा राहणार.
– श्री स्वामी समर्थ

अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो,
कोणाच्याही चुका मोजत बसू नका,
आयुष्यचं त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल.
– श्री स्वामी समर्थ

चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो,
पण साथ कधीच सोडत नाही आणि
वाईट लोकांना देव खूप काही देतो,
पण साथ कधीच देत नाही.
– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात,
संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात,
कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा
मोठेपणा असावा लागतो.
– श्री स्वामी समर्थ

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना,
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची
किंमत कळत नाही.
– श्री स्वामी समर्थ

जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते,
तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका,
कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते
– श्री स्वामी समर्थ

प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे,
तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं ,
खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ त्याचाच असतो.
– श्री स्वामी समर्थ

जगा कडून कधी अपेक्षा करू नकोस,
आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस
.
– श्री स्वामी समर्थ

आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे
हेच यशाचे रहस्य आहे.

– श्री स्वामी समर्थ

Swami Samarath Quotes in marathi

Swami Samarath Quotes in marathi
Swami Samarath Quotes in marathi

मनातून हाक मार मी येईन.
– श्री स्वामी समर्थ

माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा,
कारण तुम्हाला मी निवडले आहे
.
– श्री स्वामी समर्थ

तू फक्त मनापासून काम करत रहा,
बाकी मी सांभाळून घेईल.

– श्री स्वामी समर्थ

मी कोणत्याही रुपात मदत करायला येईल,
मला शोधू नको फक्त ओळख..

– श्री स्वामी समर्थ

स्वामी मी शून्य आहे,
मी तुमचा सेवक झालो
हेच माझ थोर पुण्य आहे

– श्री स्वामी समर्थ

एकदा श्रध्देने स्वतःला स्वामींशी जोडा,
तुमच्या सर्व चिंता स्वामिंवर सोडा

– श्री स्वामी समर्थ

माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून
काम करणारा कधीही हारत नसतो

– श्री स्वामी समर्थ

स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे
ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात…
जो माझ्याकडे चार पाऊले चालतो
त्याच्यासाठी मी शंभर पाऊले चालून येतो

– श्री स्वामी समर्थ

आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक
संकटात सोबत राहणारे माझे गुरू

– श्री स्वामी समर्थ

जर तुम्ही माझ्या मार्गाने
जात असताना दुःखी असाल,
तर थोड्याच अंतरावर
मी सुख घेऊन उभा असेल

– श्री स्वामी समर्थ

आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे,
अपेक्षा स्वतः कडूनच ठेवा,
समोरच्या कडून नका ठेवू

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
मन मोठं किती आहे हे महत्वाचं नाही,
तर त्यात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं असतं

– श्री स्वामी समर्थ

देव पावतो की नाही, माहीत नाही
पण मन सांगत माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा
देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनतात

– श्री स्वामी समर्थ

आपल्यासोबत दुसऱ्यांचही चांगलं व्हावं
अशी ज्यांची मानसिकता असते,
त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही.

– श्री स्वामी समर्थ

देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी
एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही.
फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो,
पण अगरबत्ती नाही.

– श्री स्वामी समर्थ

तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ
सुधारू शकत नाही, पण आज
मेहनत करून तुमचा येणारा
भविष्यकाळ नक्की सुधारू शकता

– श्री स्वामी समर्थ

माझ पण चांगलं होईलच
कारण स्वामींना माहिती आहे
मी कधी कोणाचं वाईट केलं नाहीये

– श्री स्वामी समर्थ

जर तुमचा विश्वास असेल की
स्वामी अस्तित्वात आहे तर ते
तुम्हाला सगळीकडे जाणवतील

– श्री स्वामी समर्थ

लाख चुका करून पण,
मला समजून घेतले माझ्या स्वामींनी
आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरू

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
स्वतःच्या कर्मावर आणि
प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा,
योग्य वेळ आली की एवढं भेटेल की
मागायला काहीच उरणार नाही

– श्री स्वामी समर्थ

स्वामी सांगतात…
आयुष्यात त्याच व्यक्ती वर विश्वास ठेवा
जो तुमच्या अंत: करणातील या तीन गोष्टी ओळखेल,
आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम,
आणि शांत राहण्यामागील कारण.

– श्री स्वामी समर्थ

Swami Samarath Status in marathi

Swami Samarath Quotes in marathi
Swami Samarath Quotes in marathi

स्वामी सांगतात..
जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल
तर तुमचे वाईट दिवस सुध्दा चांगले जातात

– श्री स्वामी समर्थ

जिथं चुकतंय तिथं खर बोलण्याची हिंमत ठेवा,
जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो आहे.

– श्री स्वामी समर्थ

मनासारखं कोणालाही जगता येत नसत,
परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे
शास्त्र म्हणजे “अध्यात्म”.

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
वेळ निघून गेली की, सर्व काही बिघडत,
परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी
वेळ जाऊ द्यावी लागते

– श्री स्वामी समर्थ

प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण
मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
स्वतःच्या गरिबीची कधी
लाज वाटू देऊ नका
कारण पैसे कमी असले तरी,
आपल्या आई वडिलांचे
कष्ट कधीच कमी नसतात

– श्री स्वामी समर्थ

नातं चार तत्वावर आधारित असतं,
आदर करणं, समजून घेणं,स्वीकार करणं
आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं

– श्री स्वामी समर्थ

तोडण आणि टाळण हा
क्षणाचा खेळ असतो,
जोडणं आणि जोडून ठेवणं
संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार,
कोणाचे गुण, कोणाचं रूप, पण आपण
कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं.
देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवल आहे

– श्री स्वामी समर्थ

कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत?
जेव्हा कोणीच दिसत नाही,
कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा
स्वामीच तर दिसतात सगळ्यात आधी.

– श्री स्वामी समर्थ

अनुभव सांगतो कोणाच्या असल्याने
नसल्याने कोणाला फरक पडत नाही
“जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला
जाईल, नसाल तर पर्याय शोधत जाईल”.

– श्री स्वामी समर्थ

बाळ नीट ऐक…
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती
कळत नकळत काहीतरी शिकवून जाते.
काही कसं वागायचं ते शिकवतात तर
काही कसं जगावं ते शिकवतात

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात…
जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते,
आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल
तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते.
अशक्य ही शक्य करतात स्वामी

– श्री स्वामी समर्थ

आपल्याकडे जे काही आहे
त्याचा चांगला उपयोग करा,
लोकांच्या उपयोगी पडा,
पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल
पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी
ही शेवट पर्यंत साथ देईल

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
तुझी कोणतीही अडचण असू दे
इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग तू
मी एका क्षणात दूर करेल हा माझा शब्द आहे.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

– श्री स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात..
श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र
दुर्लक्षित झाला नाही पाहिजे,
आणि गरीब मित्रा बरोबर वावरताना
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे

– श्री स्वामी समर्थ

चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील
तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं,
पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल
तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत
तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही

– श्री स्वामी समर्थ

धन्यवाद!

Treading

More Posts