100+Vat pornima ukhane in marathi
Vat pornima ukhane in marathi
Vat pornima ukhane in marathi : वटपोर्णिमा हा एक हिंदू उस्तव आहे. वटपोर्णिमा ही विवाहित महिला साजरी करतात. वटपोर्णिमेला सावित्री व्रत असे देखील म्हंटले जाते. यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणारी ती सावित्री. म्हणूनच वटपोर्णिमेला वडाच्या झाडाला धागा गुंडाळून साथ फेरे मारले जातात आणि पुढील सात जन्मी हाच नवरा मिळो ही प्रार्थना करतात. तसेच वडाची पूजा झाली कि महिलांचा नाव घेण्याचा कार्यक्रम सुरु होतो. तर असेच काही (Vat pornima ukhane in marathi) वटपोर्णिमा स्पेशल उखाणे इथे दिले आहेत ते तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता. Vat pornima ukhane in marathi वटपोर्णिमेसाठी खास स्पेशल उखाणे तुमच्यासाठी..!
वटपोर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात
..........रावांची लाभो मला, जन्मोजन्मीची साथ
वटपोर्णिमा सणाला भरला हिरवा चुडा
.............राव येत आहे वाट माझी सोडा
वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास
..............रावांचे नाव घेते, वटपोर्णिमेसाठी खास
वटपोर्णिमा आहे खर तर, सुवासिनींसाठी मोठा सण
.............रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन
जीवनाला सुगंध असावा चंदनाचा
.............चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा
शहाजहानने मुमताज साठी बांधला महाल ताज
.............रावांचे नाव घेते वटपोर्णिमा आहे आज
फुलांच्या बागेत फुलली मोहक शेवंती
..........राव सुखी रहावेत, ही परमेश्वराला विनंती
हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी
...............रावांचे नाव घेते वटपोर्णिमेच्या दिवशी
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
.............रावांचे नाव घेते वटपोर्णिमेच्या दिवशी
पंढरपूरच्या मंदिरात शोभते विठ्ठलाची मूर्ती
............रावांची होवो सर्वत्र कीर्ती
तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास
.............रावांसाठी ठेवला, मी वटपौर्णिमेचा उपवास
वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान
................रावांसोबत, मी संसार करीन छान
रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य
.............रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य
वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका
................... रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका
वटपौर्णिमेला व्रत ठेवायची, आहे प्रथा,
..............रावांसोबत ऐकेन आज, वटसावित्रीची कथा
वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा
.................. रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा
अधिक वाचा : Funny ukhane in marathi for male
तुटता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा,
...............रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश,
............... रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश
हृदयाचा ठोका, शरीराचा झोका,आज वटपौर्णिमा आहे म्हणून
..............रावांचे नाव घेण्याचा, भेटला मला मोका
सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
..................सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले
वटपौर्णिमेला सुहासिनी, पूजतात वड,
..................रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत जड
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
......................रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा
सावित्रीने केली सत्यवान नावाच्या, राजकुमाराची निवड,
....................रावांची होती मला, कॉलेजपासून आवड
पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
.........रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली
पावसाची झाली सुरवात, आणि आज आहे पहिला सण,
वटवृक्ष बहरले तसेच .............रावांचे बहरूदे, नेहमी मन
खाण तशी माती ............राव माझे पती,
आणि मी त्यांची सौभाग्यवती
कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज,
.................रावांचे नाव घेते वटपोर्णिमा आहे आज
वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग
.........राव सोबत असताना धरतीही वाटे स्वर्ग
सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म...........राव माझे पती राहो हीच माझी इच्छा
लाल मणी तोडले, काळे मणी जोडले
..........रावांसाठी आई वडील सोडले
वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी
........ रावांसाठी दीर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती
वटपौर्णिमेला भरते सुवासिनींची ओटी,
.........रावांचे नाव सदा माझ्या ओठी
पतिव्रता धर्माचा सावित्री आदर्श,
........रावांचे नाव घेता मणी दाटे हर्ष
वटपौर्णिमेला आहे वडाचे महत्त्व,
..........रावांची वाढो कीर्ती आणि कर्तृत्व
वाण देते सुवासिनीचे कुंकू लावते भाळी,
........रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या पुजेवेळी
वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे,
पती म्हणून ..........राव जन्मोजन्मी मिळावे
वडापुढे लावली तुपाची फुलवात,
सुख, समृद्धि, आरोग्य नांदो .........रावांच्या जीवनात
पतिव्रता सावित्री पुढे हार मानली यमाने,
...........रावांच नाव घेते प्रेमाने आणि आदराने
वटपौर्णिमेचे व्रत करते सत्यवान सावित्रीला स्मरूण,
.......... रावांना दीर्घायुष्य मागते वडाला नमस्कार करून
सावित्रीची कथा मनाला भावली,
.........रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
चांदीच्या वाटीत खडीसाखरेचे खडे.
................रावांचे नाव घेते वडापुढे
वडाची पूजा करून मागते दीर्घा युष्याचे दान,
................रावांसोबत करते सुखाचा संसार छान
मनोभावे पूजा केली ते सौभाग्याचं वाण,
..................रावांसाठी मागितले दिर्घायुष्याचे दान
कमळाच्या फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात,
..............रावांच नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात
निशीगंधाची कळी उमलते संध्याकाळी,
..............रावांच नाव घेते वडाला पूजायच्या वेळी
कोल्हापूरच्या देवीपुढे, हळदी कुंकवाच्या राशी
..............रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी
मंगळसूत्रात राहे, सासरची प्रीती
..............रावांचे नाव घेते समाधान चित्ती
वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस,
..............रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस
पाच सुहासिनी स्त्रियांची ओटी मी भरली,
...............रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली
कांजीवरम साडी बनारसी खण,
................रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण
सुहासिनिंचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी,
............रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पुजेसाठी
मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण,
...............रावांचे नाव घेते सुखी राहू देत सर्वजण
वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन
..............रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेच्या सण
आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे,
.............रावांसारखे पती,जन्मोजन्मी मिळावे
बोलत असताना,होते मी मग्न
............रावांसारखे पती भेटू देत सात जन्म
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
.............रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा
जीवनरुपी काव्य दोघांनी वाचावी,
............रावांची साथ जन्मोजन्मी असावी
पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा,
वटपौर्णिमेच्या दिवशी.................. रावांच नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा
असेच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी आमच्या website ला अवश्य भेट द्या. धन्यवाद!