Rukhwat Faral Ukhane in marathi | 100+लग्न समारंभासाठी खास मजेदार रुखवत स्पेशल उखाणे.

Rukhwat Faral Ukhane in marathi

Rukhwat Faral Ukhane in marathi

Rukhwat Faral Ukhane in marathi : नमस्कार मित्रांनो, उखाणा घ्यायला कोणाला आवडत नाही तर सर्वांना आवडतो उखाणा हा अनेक वेगवेगळ्या शुभप्रसंगी घेतला जातो. आज आपण स्पेशल (Rukhwat Faral Ukhane in marathi) रुखवत फराळ वरील उखाणे मराठी मध्ये पाहणार आहोत. लग्न समारंभासाठी खास मजेदार रुखवत स्पेशल उखाणे.

लग्नात भेटले साडू साडू,
मी तर आहे रव्याचा लाडू.

जाऊ बाई बिगी बिगी अंथरा सतरंजी,
आणल्या आहेत नऊ करंजी

साडी साडी पेशवाई,
मी तर आहे बालुशाही.

पाटलाच्या शेतात पेरला घेवडा,
आत आहे खुसखुशीत चिवडा.

तूप पाडायला घेतला चमचा चांदीचा,
घमघमाट सुटलाय बुंदीच्या लाडूचा.

मोर आहे पक्षांचा राजा,
मी तर आहे खुसखुशीत खाजा.

कडीवर कडी सोन्याची कडी,
आत आहे कुरवडी.

लाखाची मुठ सोन्याने झाकली,
आत आहे तिखट चकली.

गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने वाढते रक्त,
गुलाबजामुन पाठवते वहिनीबाई साठी फक्त.

सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी,
मी तर आहे खारी बुंदी.

पैठणी साडीला सोन्याची जरी,
मी तर आहे गोड पुरी.

अधिक वाचा: जगद्गुरू तुकाराम महाराजांचे गोड अभंग

सौभाग्याचे लेणी आहे हिरवं कापड,
आत आहेत तांदळाचे पापड.

जावईबापू घ्या जरा सबुरी,
आत आहेत फुगलेली सांजोरी.

घनदाट जंगल तिकडून आला लांडगा,
मी तर आहे तिखट सांडगा.

गोड गोड सारणाने टम्म मी फुगले,
या करंजीला पाहून जावईबापूच हसले.

पहा जावई बापू माझ्या लेकीकडे पाहतात कसे,
मी तर आहे गोड गोड अनारसे
.

लग्नाचे जेवण खाऊन डोळ्यावर आली झापड,
यात आहेत उडीदाचे पापड.

सौभाग्याचे अलंकार कुंकू आणि टिकली,
मी तर आहे खमंग चकली.

अधिक महिन्यात वान द्यावा लेकी जावया,
मी तर आहे नाजूक शेवया.

नवरा नवरीची प्रीती आहे गुलाबी,
यात आहे गोल गोल जिलेबी.

कोल्हापूरला आहे रंकाळा त्यातही कमळाची कळी ,
सासुबाई मी आहे शंकरपाळी.

आंबा आहे फळांचा राजा,
उघडून पहा मी आहे खाजा.

सर्वांना केला नमस्कार वाकून,
बेसनचे लाडू बघता का चाखून.

दीदीच्या लग्नात भावांना येतो चेव,
यात आहे खमंग शेव.

उघडून पाहताच खायला होईल घाई,
मी तर आहे गोड बालुशाही.

ननंद बाई देवपूजेसाठी लागतो गडू,
मी आहे मनमोहक बेसनाचा लाडू.

Rukhwat Faral Ukhane in marathi

दारात फुलला केवढा यात
आहे खमंग चिवडा.

इंग्रजीत चॉकला म्हणतात खडू,
नवरदेव इतका गोड आहे जसा बुंदीचा लाडू.

लग्नात भारी होता तुमच्या बँड बाजा,
मी तर आहे खुसखुशीत खाजा.

शिदोरी थोडी राखून ठेवते वारकऱ्यांसाठी,
फराळी चिवडा मात्र दिला विहीणबाई साठी.

दारात फुलली जाई जुई,
मी तर आहे कुरडई.

चिवडा शेव आणि चकली चुकून झाले सर्व मिक्स,
आत मध्ये आहेत बनाना चिप्स.

दत्ताला प्रिय आहे गाय महादेवाला प्रिय आहे नंदी,
आठवणीत ठेवा मला मी तर आहे खारी बुंदी.

मोगऱ्याच्या फुलांचा दरवळतो सुहास,
विहीणबाईंसाठी पाठवते काजुकतली खास.

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
या दुरडी मध्ये आहेत करंजा खास.

सकाळी सकाळी खुलते गुलाबाची कळी,
विहीणबाईंसाठी पाठवते आहे खुसखुशीत शंकरपाळी.

हसताना पडते गालावर खळी माझे नाव,
सर्वांनाच माहिती आहे मी आहे चंपाकळी.

सकाळी उठल्या उठल्या व्हाट्सअप चेक करायची असते मला घाई,
विहीणबाईंसाठी पाठवते गोड बालुशाही.

सगळीकडे मान आहे करवलीचा,
यात आहे लाडू मुरमुर्याचा.

टाकू नका अशी नजर वेडी वाकडी,
खाऊन तर बघा एकदा खमंग पापडी.

लग्नात असते खूपच घाई,
मी तर आहे रंगबिरंगी कुरडई.

लग्नघर आहे चला दारात रांगोळी काढू,
मी आहे बेसनाचा लाडू.

कार्यालयात घुमतो आवाज सनई चौघड्याचा,
मी तर आहे गोड लाडू बुंदीचा.

नऊवारी साडी वर लावते मी चंद्रकोरीची टिकली,
वहिनी बाईंसाठी पाठवते खमंग चकली.

दारात फुलला जाई जुई आणि केवडा,
मी तर आहे खुसखुशीत असा चिवडा.

अगरबत्तीचा सुगंध दरवळतो इकडे तिकडे,
यात आहेत सगळ्यांच्या आवडते पार्ले, मारी आणि गुड डे.

जावईबापू नका एवढे लाजू,
खास तुमच्यासाठी पाठवले आहेत काजू.

संसार सौख्याची आहे मनामध्ये आस,
विहीणबाई साठी पाठवते तांदळाचे पापड खास.

रुखवत पाहायला करू नका लेट,
आता हे गोड गोड चॉकलेट.

माहेरची वाट आहे खूपच वाकडी तिकडी,
अहो मी तर आहे तुमची सोनपापडी.

हंड्यावर हंडे आहेत सात,
जाळीदार अनारसे आहेत यात.

लग्नासाठी आत्ताच घेतली तुळशीबागेतून पर्स,
यात आहेत बटाटा वेफर्स.

सात जन्मासाठी जुळले नाते नवरा बायकोचे,
यात आहेत पापड नाचणीचे.

अहो ऐका… मेव्हणी म्हणते अर्धा माझा वाटा,
यात आहे गोड गोड पेठा.

आले आले वधू वर सर्वांना अक्षदा वाटा,
मी तर आहे गोड गोड चिरोटा.

चांदीच्या ताटात ठेवलेत सोन्याचे देव,
मी तर सगळ्यांची आवडती खमंग शेव.

आमच्याकडे जरा स्पेशल लक्ष ठेवा,
अहो आम्ही तर आहोत सुकामेवा.

विहीणबाईंनी नेसली पैठणी साडी,
यात आहे चितळ्यांची बाकरवडी.

Treading

More Posts