Ashadhi ekadashi 2024 | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यात येते. आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात. एक म्हणजे शुध्द एकादशी आणि विद्य एकादशी. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला पूज्य मानले जाते. या एकादशी निम्मित अनेक वारकरी पंढरपूरची वारी करतात विठ्ठलास भेटावयास जातात. घराघरात या आषाढी एकादशी निमित्त उपवास केला जातो. महाराष्ट्रात च्या काना कोपऱ्यातून विठ्ठल नामाचा गजर करीत एकादशीला पायी दिंडी मध्ये सहभागी होतात. यालाच आषाढी वारी असे म्हणतात. पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं. विठ्ठलाच मनोभावे दर्शन घेतले जाते. या आषाढी निम्मित महाराष्ट्रा सह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात. जस की पैठणहून एकनाथांची पालखी. त्रिंबकेश्र्वरहून निवृत्ती महाराजांची पालखी येते. देहू हून तुकाराम महाराजांची पालखी आळंदी हून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरात येत असते.
आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे.आषाढी एकादशी हा वारकरी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस आहे. चला तर मग या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊ. Ashadhi ekadashi 2024 (Ashadhi ekadashi 2024 quotes in marathi,ashadi ekadashi 2024 marathi images).
प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत पाळले जाते. या दिवशी दिवसभर उपवासही केला जातो. हा उपवास केला तर मागील जन्माचे सर्व पाप नष्ट होतात. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीचे (Devshayani Ekadashi 2024) व्रत विशेष मानले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभ एकादशी, हरिशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) असेही म्हटले जाते. आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी योगनिद्राला म्हणजेच झोपेत जातात आणि नंतर कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशीच्या दिवशी जागे होतात.

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्री मुख आवडीने
आषाढी एकादशीच्या सर्व
वारकरी भक्तांना शुभेच्छा

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Read More : Ganesh chaturthi wishes in marathi

पाणी घालते तुळशीला वंदन करते
देवाला सदा आनंदी ठेव माझ्या
मित्र-मैत्रिणींना हीच प्रार्थना आहे
माझ्या पांडुरंगाला सर्वांना
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा माऊली

तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

भक्तापाई सुखालाही आला या
हो आनंदाचा पुर चालला नामाचा
गजर अवघे गर्जे पंढरपूर
आषाढी वारीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
Ashadhi ekadashi 2024 quotes in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीला विठुरायाचे सगळे भक्त दूरदूर वरून वारीसोबत पंढरपूरला येत असतात. काही भाविक या निमित्त एक दिवस व्रत पाळतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेषनागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीस पद्मा एकादशी सुद्धा म्हटले जाते. या दिवशी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल होतात. सकाळी लवकर चंद्रभागेत अंघोळ करून सर्व भाविक रांगेत उभे राहून विठू माऊलीचे दर्शन घेतात. काल्याचे किर्तन करून पुढच्या वारीला जातात.

आषाढी सरसर ओल्या सरी चिंब
भिजती वारकरी जप मुखी पांडुरंग
हरी टाळ चिपळ्यात दंग सारी
विठू माऊलीचा नाद लय भारी
आषाढी वारीच्या खूप शुभेच्छा माऊली

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा मेळा जमला
भक्त गणांचा ध्यास विठु माऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

टाळ वाजे मृदुंग वाजे
वाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू दिसतो सावळा
कपाळी चंदनाचा टिळा
आम्हा वारकऱ्यांना लागला
देवा तुझ्या भक्तीचा लळा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे
आणिक काही इच्छा आम्हा
नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची
कृपा तुम्हा साऱ्यांवर कायम राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
आषाढी वारीच्या माऊली तुम्हाला खूप शुभेच्छा