Chanakya niti (chanakya niti for motivation) thought chanakya niti
Chanakya niti
Chanakya niti : आचार्य चाणक्य यांचे मूळ नाव विष्णूगुप्ता आणि कौटिल्य असे होते .त्यांचा जन्म पाटीलपुत्र, मगध म्हणजे अताचे पटना, बिहार आहे.आचार्य चाणक्य हे महान विद्वान पंडित होते.चाणक्य हे स्वाभिमानी,संयमी आणि तीक्ष्ण बुद्धिमान होते. आचार्य चाणक्य हे चाणक्य चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचे महामंत्री होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे “चाणक्य नीति” या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्य नीतिकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते.आचार्य चाणक्य हे तक्ष्यशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते.राजनीती आणि कूटनितीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली.त्यात नीतिशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतिशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच “चाणक्य नीति”.
Chanakya niti किंवा चाणक्य नीती शास्त्र हे आचार्य चाणक्य यांच्या द्वारे रचलेला एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये धन, यश, विश्वास, मित्र, पत्नी, व्यवहार,आचरण, सुख, ध्येय, अपयश, संकट अशा सर्व गोष्टींवर उपदेश चाणक्य नीती मध्ये आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या मध्ये उपदेश आहेत.आचार्य चाणक्य यांची Chanakya niti आपल्या जीवनामध्ये उपयुक्त पडू शकते. अंधारात सूर्यप्रकाषप्रमाणे आपले मार्गदर्शन करू शकते. यश, धन व्यापार, परिवार, संपत्ती इत्यादी सर्व क्षेत्रात तुम्ही Chanakya niti चा वापर करू शकता आणि यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, Chanakya niti मध्ये एकूण 17 अध्याय आहेत. माझ्या आर्टिकल मध्ये Chanakya niti संपूर्ण मराठी भाषेमध्ये सांगणार आहे. chanakya niti for motivation चा वापर करून तुम्ही जीवनातील अनेक संकटांचा सामना करू शकाल आणि यशस्वी होऊ शकता.
You may also like: Chanakya niti for motivation
जीवनात यशवी कशे व्हावे, बुद्धिमान व्यक्तीचे आचरण कसे असावे, धन, संपत्ती, पुत्र, पत्नी, व्यवहार, जीवन, विद्या, कर्तव्य,अशा जीवनातील प्रत्येक गोष्टींवर त्यांनी thought chanakya niti चाणक्य नीति मध्ये मार्गदर्शन केले आहे.
Thought chanakya niti
- मूर्ख शिष्यास उपदेश केल्याने आणि दुष्ट स्त्रीचे पालन पोषण केल्याने, तसेच दुःखी व्यक्तीच्या अतिसहवासाने विद्वान व्यकी ही दुःखी होतो.
- दुष्ट पत्नी,खोटा मित्र, प्रत्युत्तर देणारा नोकर आणि साप असलेल्या घरात निवास हे साक्षात मृत्यु सारखे आहे.
- व्यक्तीला भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी धनसंचय करायला पाहिजे.
- धनसंपत्तीचा त्याग करून पत्नीची सुरक्षा करायला पाहिजे आणि जर आपला नाश होत असेल तर संपत्ती आणि पत्नी देऊन आत्मरक्षण करावे.
- ज्या देशात तुमचा सत्कार नाही आणि जीवनोपायही नाही व कोणी आपले बंधवही नाहीत.तसेच विद्या प्राप्ती ही नाही,त्या देशात क्षणमात्र ही राहू नये.
- ज्या गावात धनवान, श्रोत्रिय ब्राह्मण,राजा,नदी,वैद्य ही पाच नाहीत,तेथे एक दिवसही राहू नये.अशा ठिकाणी जो राहतो,त्याला सुख मिळत नाही.
- ज्या देशी लोकांच्या देहनिर्वाहाविषयी कोणताही उपाय, कोणाचेही भय,दक्षपणा आणि दानस्वभावही नाही,तेथे ज्ञात्याने कदापि राहू नये.
- कामावरून नोकराची,संकटकाळी बंधवाची, आपत्तीच्या वेळी तसेच वैभवक्षयाच्या वेळी पत्नीची परीक्षा होते.
- रोगप्राप्ती काळी,संकटकाळी,धान्य आपत्तीच्या वेळी,शत्रूंपासून संकट आल्यावर,राजाच्या दरबारातील कामाच्या वेळी आणि स्मशानात या ठिकाणी जो तुम्हाला साथ देतो,तोच तुमचा खरा मित्र असतो.
- जो अविनाशी वस्तू सोडून नाशवंत वस्तूच्या मागे लागतो,तो अविनाशी वस्तू सोडतोच,पण नाशवंत वस्तू नाश पावल्याने,तो या दोन्ही वस्तूंना मुकतो.
- बुद्धिमान पुरुषाने कन्या वरताना मुलगी रूपहिन असली तरी उत्तम कुळातील करावी.
- रूपाने संपन्न पण नीच कुळातील कन्येशी लग्न करू नये.कारण विवाह इत्यादी संबंध आपल्या बरोबरीच्या कुळाशी करावा.
- नदी आणि श्र्वानादी इत्यादी नखांची जनावरे, गवादीक शिंग असलेले पशू,निरंतर हाती शस्त्र बाळगणारे, स्त्रिया तसेच राजकुल,यांचा कदापि विश्वास करू नये.
- विषातूनही अमृत शोधून घ्यावे, अमंगळमध्ये पडलेले सुवर्ण क्षालनादी करून घ्यावे,उत्तम विद्या निच माणसापासूनही घ्यावे,तर कन्या जर सर्व गुणसंपन्न असेल,तर ती नीच कुळातील असेल,तरी तिच्याशी लग्न करावे.
- पुरुषांच्या तुलनेत स्त्रीचा आहार दोन पट,शरम चार पट,साहस कर्म (अविचाराने वागणे) सहापट आणि कामेच्छा आठ पट असते, हे लक्षात ठेवा.
- मिथ्या भाषण, अविचाराने काम करणे, कपट, मूर्खपणा, अतिलोभ आणि निर्दयपणा है स्त्रियांचे स्वाभाविक दोष असतात,है लक्षात ठेवा.
- खाद्य पदार्थ उपलब्ध असताना भोजन शक्ती असणे, स्त्री उपलब्ध असताना रतीशक्ती असणे, वैभव प्राप्त असताना दान शक्ती असणे, है मोठे पुण्याचे फळ होय.
- पुत्र ज्याच्या स्वाधीन आहे,ज्याची पत्नी मनाप्रमाणे वागणारी आहे व जो प्राप्त वैभवात संतुष्ट आहे, त्याला याच जन्मात स्वर्गसुख आहे.
- जे पित्याचे भक्ती पूर्वक आज्ञापालन करतात, तेच खरे पुत्र, जो पुत्रांपासून पुढे सुखाची अपेक्षा न करता त्यांचे पोषण करतो,तोच खरा पिता.
- ज्याच्यावर पूर्ण विश्वास टाकने शक्य आहे, तोच खरा मित्र आणि जिच्या सोबत सुख प्राप्ती होते, तीच खरी पत्नी होय.
- विषाने भरलेल्या परंतु मुखी दुध असलेल्या माडक्या प्रमाणे समोर प्रिय व हितकर बोलणाऱ्या परंतु पाठीमागे कार्यनाश करू पाहणाऱ्या मित्राला जवळ करू नये.
- उत्तम आचार कुळाला प्रसिद्ध करतो.चांगले भाषण देशात प्रसिद्ध करते.मोह स्नेहाला प्रसिद्ध करते आणि उत्तम भोजन देहाला पुष्ट करते.
- मेघाच्या उदकासारखे दुसरे शुद्ध उदक नाही, स्वबळासारखे अन्य कोणतेही बळ नाही, नेत्रासारखे दुसरे तेज नाही आणि धान्यासारखे दुसरे काहीच प्रिय नाही.
- द्रव्यहीन लोक द्रव्याची इच्छा धरतात.ज्याला वाचा नाही,बोलता येत नाही,ते वाणीची इच्छा करतात.
- सत्यामुळे पृथ्वीची रक्षा होते,सूर्य ही सत्याच्या आधारे प्रकशतो, सत्याच्या आधारे वायू वाहतो.असे सर्व विश्व व्यवहार सत्याच्या आधारावर चालतो.सत्य सर्वांचे धारक आहे.
- मनुष्यामध्ये न्हावी चतुर, पक्षानंमध्ये कावळा धूर्त, चार पायांच्या पशुंमधे कोल्हा धूर्त, आणि स्त्रियांमध्ये माळीन धूर्त समजावी.
- ज्याचे जसे दैव असेल,त्यानुसार त्याला बुध्दी मिळते, त्याचे आचरण ही त्या नुसार होते व त्याला मदत ही त्याप्रमाणेच मिळते. अशा प्रकारे नशिबाला अन्यथा करण्यास कुणीही समर्थ नसतो.
- कार्य मोठे असो किंवा छोटे असो,ते कसे प्रयत्न पूर्वक करावे,ते माणसाने सिंहाहापासून शिकावे,असे शास्त्र सांगते.
- नेहमी दान करने, गोड भाषण करने, देव पूजन करणे, व ब्राम्हण भोजन घालने, ही चार लक्षणे ज्या पुरुषांच्या अंगी असतील, तो या लोकांत असून सुद्धा स्वर्गातच आहे,असे समजावे.
- अति क्रोध, कठोर वाणी, दारिद्रय, स्वजनांशी वैर, नीचाचा प्रसंग व कुलहिन सेवा, ही सहा लक्षणे ज्या पुरुषाच्या ठायी असतात, ते या लोकांत असूनही नरकातच आहेत,असे समजावे.
- कास्य पात्र भस्माने स्वच्छ होते, तांबे आम्लाने स्वच्छ होते, स्त्री रजामुळे शुद्ध होते, तर नदी प्रवाहाच्या वेगामुळे शुद्ध होते.
- सतत फिरणारा राजा, ब्राम्हण व योगी है सर्वत्र पूज्य होतात. पण स्त्री मात्र फिरणारी असेल, तर ती नाश पावते.
- आपणच कर्म करतो व आपणच त्या कर्माचे फळ भोगतो. संसाराच्या ठायी आपणच भ्रमण पावतो व आपणच त्यातून मुक्त ही होतो.
- राज्यात प्रजेने केलेले पाप राजा भोगतो,तर राजाने केलेले पाप त्याचा पुरोहित भोगतो, स्त्री ने केलेलं पाप तिच्या पतीला प्राप्त होते,तर शिष्याने केलेले पाप गुरूला भोगावे लागते.
- कर्ज करून ठेवणारा पिता हा शत्रू समान असतो. माता जर व्यभिचारी असेल, तर तिला शत्रू समजावे.
- राजा अधर्मी, प्रजेला पीडा असण्यापेक्षा मुळीच नसलेला बरा. तसेच वाईट मित्र असण्यापेक्षा मुळीच नसलेला बरा.
- धन, धान्य संपादन करण्याच्या कामात विद्या मिळवण्यासाठी, भोजनाच्या बाबतीत व व्यवहाराच्या बाबतीत जो माणूस लाज बाळगणार नाही,तो सुखी होईल.
- लोकांमध्ये टिकून राहायचे असेल,तर अत्यंत सरळ राहून उपयोग नाही. थोडा वाकडेपणा, क्रोध, अभिमान आवश्यक आहे.
- भोजनकाळी पाणी पिल्यास ते अमृताप्रमाणे आरोग्यदायक असते. आणि भोजन झाल्यावर लगेच पाणी पिल्यास ते विषाप्रमाणे असते.
- शांती सारखे दुसरे तप नाही, संतोषा सारखे दुसरे सुख नाही,तुष्णे सारखी दुसरी कोणतीच व्याधी नाही आणि दये सारखा दुसरा कोणताच धर्म नाही.
- क्रोध हाच यमराज आहे,तृष्णा हीच वैतरणी नदी, विद्या – ज्ञान हीच कामधेनू, तर संतोष हेच स्वर्ग आहे,नंदनवन आहे.
- गुणांमुळे रूपाला शोभा येते, शिल उत्तम स्वभावामुळे कुळाला शोभा येते, सिद्दीमुळे विद्याला शोभा येते,तर भोगामुळेच धनाला शोभा प्राप्त होते.
- मांस भक्षण करणारे, सुरापान करणारे निरक्षर व मूर्ख हे मनुष्याच्या रुपात पशुच आहेत. अशा पुरुशाकार पशुंमुळे पृथ्वीला मात्र अकारण ओझे होते.
- जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर विषयांच्या विषाप्रमाणे त्याग कर आणि क्षमा ,सरलता, दया, निर्मलता, सत्य या गुणांचे अमृताप्रमाणे सेवन कर.
- दुष्ट लोक एकमेकांचे गुप्त रहस्य लोकांत बोलतात व ते वारूळ मधील साप जसा स्वतः च आपला नाश करून घेतो, त्याप्रमाणे आपला नाश करून घेतात.
- साप, राजा, सिंह, वराह, बालक, दुसऱ्यांचे श्वान आणि मूर्ख या सात जणांना ते झोपलेले असताना जागे करू नये.
- रंकाला राजा करणे अथवा राजाला रंक बनविणे, धनवानाला निर्धन करणे अथवा निर्धनाला धनवान बनविणे,ही सर्व ईश्वरी लीला आहे.
- काम, क्रोध, लोभ, गोड पदार्थ, शृंगार, कौतुक, निद्रा, सेवा या आठ गोष्टींचे अतिसेवन टाळावे.फक्त देह निर्वाहापुरतेच सेवन करावे.
- आपला अपराध हा एक वृक्ष असून त्या झाडाची दारिद्रय,रोग, दुःख,बंधने आणि संकटे ही फळे आहेत, ती माणसाला याच देहात प्राप्त होतात.
- धन, मित्र ,स्त्री तसेच राज्य ही सर्व नष्ट झाल्यास पुन्हा प्राप्त होतात.पण सर्व पुरुषार्थाचे साधन म्हणजे आपले शरीर जर आपण गमावले तर ते मात्र पुन्हा प्राप्त होत नाही.
- गुणसंपन्न असणारा तसेच धर्माने वागणारा माणूसच खरा जगतो.म्हणजे अल्पायु झाला तरी कीर्तीरूपाने जिवंत राहतो.