Marathi ukhane | मराठी उखाणे (मराठी उखाणे नवरी साठी)ukhane marathi

Marathi ukhane

Marathi ukhane

नमस्कार मित्रांनो , तुम्ही जर Marathi ukhane शोधत असाल तर तुम्ही योग्य पेज वर आले आहात. आपल्याकडे कोणता सण असेल किवा लग्न असेल ,पूजा असेल तर हमखास उखाणा घ्यावा लागतो आणि त्याचा एक आनंदच वेगळा असतो. हळदी-कुंकू उखाणे तसेच satyanarayan pooja ukhane त्यासाठी देखील छान छान उखाणे आहेत. मकर संक्रांतीच्या सणासाठी अगदी नवीन उखाणे इथे दिलेले आहेत .

haldi kunku ukhane ( हळदी कुंकू उखाणे )| Marathi ukhane

Marathi ukhane

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र – सूर्य झाले माळी ,
______चे नाव घेते हळदी – कुंकुवाच्या वेळी .

निळ्या – निळ्या आकाशात उगवला शशी,
_______ रावांचे नाव घेते हळदी- कुंकवाच्या दिवशी .

कपाळाच कुंकू , जसा चांदण्याचा ठसा
_______रावांचे नाव घेते सारे जन बसा .

मावळला सूर्य , चंद्र उगवला आकाशी
_______रावांचे नाव घेते हळदी – कुंकुवाच्या दिवशी .

कान भरण्यात बायका आहेत हौशी ,
_______रावांचे नाव घेते हळदी – कुंकुवाच्या दिवशी .

हळदी – कुंकू घेतले चांदीच्या ताटी ,
______ची जोडी अशी जशी जुळून येती रेशीमगाठी .

तुळजाभवानी माते वंदन करते तुला ,
______रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला .

वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस , कधी पुनव तर कधी दिवस
______रावांचे नाव घेते आज आहे, हळदी – कुंकुवाचा दिवस .

हळदी – कुंकूचे निमंत्रण आले काल ,
______रावांचे नाव घेते कुंकू लावते लाल .

कुंकू म्हणजे सौभाग्य , संसार म्हणजे खेळ
______रावांचे नाव घेते आज आहे हळदी – कुंकवाची वेळ .


मकरसंक्रांत उखाणे मराठी ( sankrant special ukhane )

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास ,
_______रावांचे नाव घेते मकर संक्रातीला खास .

तिळगुळ घ्या गोड – गोड बोला ,
______रावांचे नाव घेण्याचे लाभले सौभाग्य मला .

लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रात ,
_______रावांचे नाव घेते , सुख – समृद्धी येऊ दे आमच्या संसारात .

आईसारखी माया जगात नसते कुणाला ,
_______रावांचे नाव घेते संक्रातीच्या सणाला.

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला ,
_______राव म्हणतात राणीसाहेब फिरायला चला.

तिळासारखा असावा स्नेह , गुळासारखी असावी गोडी ,
ईश्वर सुखी ठेवो माझी आणि _____रावांची जोडी .

संसाररूपी करंजीत प्रेमरूपी सारण ,
_______रावांचे नाव घेते संक्रातीचे कारण .

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ,
_______रावांचे नाव घेते मकर संक्रातीच्या दिवशी .

संक्रातीच्या दिवशी दिलं “तीळ” आणि “गुळ”
________ रावांच नाव घेताच पवित्र झाल माझ कुळ.

घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण ,
________रावांचे नाव घ्यायला संक्रातीचे कारण .

कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज ,
_________रावांचे नाव घेते संक्रात आहे आज .

हलव्याचे दागिने चढवून शृंगार मी केला ,
________रावांच नाव घेते तिळगुळ घ्या गोड-गोड बोला .

संक्रातीच्या सणाची आगळी – वेगळी गोडी ,
लाखात एक ______रावांची आणि माझी जोडी .

ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल ,
_______रावांचे नाव घेते संक्रातीच्या दिवशी स्पेशल .

सासू आहे प्रेमळ नणंद आहे हौशी ,
_______रावांचे नाव घेते मकर संक्रातीच्या दिवशी .

हातात घातल्या बांगड्या ,गळ्यात घातली ठुशी ,
_______रावांचे नाव घेते मकर संक्रातीच्या दिवशी .

तिळगुळाची गोडी आयुष्यभर नात्यात राहावी ,
_______रावांच्या सहवासात आनंदाची बरसात व्हावी .

मोत्याची माळ , सोन्याचा साज
______रावांचे नाव घेते , संक्रात आहे आज .

तीळा सोबत गुळाचा गोडवा किती छान ,
______रावांचे नाव घेऊन देते संक्रातीचे वान .

                            अधिक वाचा : मराठी जोक्स

satyanarayan pooja ukhane (satyanarayan pooja ukhane for female) Marathi ukhane

Marathi ukhane

आजच्या पूजेला फुलांच्या राशी ,
_______रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी .

महाराष्ट्राची परंपरा आहे मंगळागौरी चे खेळ ,
_______रावांचे नाव घेते झाली सत्यनारायण पुजेची वेळ .

देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी ,
______ रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी .

सत्यनारायणाची पूजा मनोभावे करते ,
______रावांसाठी दीर्घायुष्य मागते .

मोत्यांची माळ , सोन्याचा साज
______रावांचे नाव घेते सत्यनारायण आहे आज .

समोर ठेवल्या पंचपक्वनाच्या राशी ,
______रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी .

फुलांइतकीच मोहक दिसते , गुलाबाची कळी
______रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या वेळी.

हातात बांधल्या बांगड्या , गळ्यात घातली ठुशी ,
______रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

घास भरवतानाचे उखाणे ( Marathi ukhane )

Marathi ukhane

मुंबई ते पुणे ३ तासाच आहे अंतर …..
आधी खाऊन घेतो जरा ,नावाच बघू नंतर….

सुंदर रांगोळ्यांनी आणली , पंगतीला शोभा
_______ला भरावतोय घास सर्वांनी बघा ……

छोट्या टेकडीवर बांधले , मोठे फार्म हाउस
घास भरवतो ______ बोटं नको चावूस …….

संसाराच्या गणिताचे सुरु झाले पाढे ,
______रावांच नाव घेऊन भरवते मी पेढे …

प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी ,
आज भरवते _____ला गोड – गोड बासुंदी …

घरात दरवळला अत्तराचा सुवास ,
______ला भरवते प्रेमाचा घास …..

सुख – समाधान असेल तिथे लक्ष्मी चा वास ,
________रावांना देते मी प्रेमाचा घास ….

संसारात प्रेमाला हवी विश्वासाची जोड ,
________रावांचे नाव घेते ______भरवून गोड ……

_______भरवण्यात येतो आनंद आगळा
घे पटकन नाहीतर , मी फस्त करेन सगळा…..

इंस्टाग्रामच्या बायोला टाकला आहे फुडी ,
_______राव आहेत खूप मुडी…….

आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास ,
______ रावांना भरवते मी गुलाबजामून चा घास ……

Treading

More Posts