Marathi love quotes | Married couple husband wife love quotes (150+मराठी लव शायरी sms)
Marathi love quotes
Marathi love quotes : नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर दुरावा वाढतो आणि अंतर वाढते यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते चूक खरी तर वेळेची असते यावर एकच उपाय आहे, त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील जीवाला जीव देणारी माणस खूप कमी असतात त्यांना असे गमवू नका. आयुष्याची मज्जा एकटे जगण्यात नसते म्हणून तर आपण आपल्या जोडीदाराबरोबर सुखमय आयुष्य आनंदाने घालवावे. Married couple husband wife love quotes-Download
तुम्हाला तुमच्या बायकोला किवा तुमच्या प्रेयसिला प्रेमाचे सुविचार (Marathi love quotes) शुभेच्छा म्हणून पाठवायचे असतील तर तुम्ही इथून पाठवू शकता. तसेच आपण स्वतः वर देखील प्रेम केले पाहिजे त्यासाठी self love quotes for girls पण तुम्ही download करू शकता. बहिणीचे-भावावर आणि भावाचे-बहिणीवर खूप प्रेम असते त्यांच्या नात्याला तोडच नाही. आईनंतर जीव लावते ती बहिण असते आणि वडिलांनंतर जीव लावतो तो असतो भाऊ. बहिण-भावाच्या प्रेमासाठी काही सुविचार (sister love quotes, brother love quotes) तुम्ही इथून download करू शकता.
तुझं माझं नात हे असचं रहाव कधी मैत्री तर कधी प्रेम असाव..
अबोल तू,अस्वस्थ मी अक्षर तू,
शब्द मी समोर तू,आनंदी मी सोबत तू,
संपूर्ण मी..
प्रेम करायचं तर असं करायचं कि ती
व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो पण कधी त्या व्यक्ती ने
प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे..
Read more : Marathi jokes for friends
प्रेम हे फक्त भेटण नाही तर एकमेकांसाठी जगण आहे
तू जेव्हा माझ्यासोबत असतेस मला जीवनाचा खरा अर्थ कळतो..
प्रेम म्हणजे ..समजली तर भावना, केली तर मस्करी .
मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास रचला तर संसार
आणि निभावलं तर जीवन..
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे ,
मरेपर्यंत साथ देईन हा माझा शब्द आहे…
प्रेम करायला मन चांगले असावे लागते, चेहरा नाही…
आपल्या प्रेमाची कहाणी आकाशातल्या तार्यांसारखी
अमर आणि अनंत सदैव चमकत राहिलं..
एकमेकांच्या आत्म्याच प्रेमान केलेलं मिलन हे जगातील सर्वात
सुंदर गीत अनंत काळ गुणगुणत राहिलं…
तुझ्यासोबत चालताना मला वेळेची सुद्धा जाणीव नसते
तुझ्या प्रेमाच्या पाऊलखुणा माझ्या जीवनाचा मार्गदर्शक बनते..
Read more : Marathi ukhane for female
प्रेम म्हणजे नात्याची मिठास एकमेकांसाठी असण्याची
खासियत तुझ्या आठवणीत माझं हृदय नेहमी नाचत राहील..
आज वारा वाहतोय त्या माळरोपाच्या लयीत आणि
आता तुझच नाव येतंय माझ्या प्रत्येक नव्या ओळीत….
प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास…
दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ हि घट्ट बसते…
दोघांकडून नात जपण्यासाठी दिलेलं प्रेम, विश्वास,एकमेकांचा आदर,
आणि काळजी नातं शेवटपर्यंत घट्ट जोडून ठेवते…
जातो म्हणताना दिलेल्या मिठीत अक्खी भेट सामावलेली असते..तू आणि मी
एखादी रात्र मोठी असावी तू सोबत असताना…
मोठ्या-मोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही,
छोट्या-छोट्या भावना समजून घेतल्या तर ते जास्त घट्ट होतं..
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते…
फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं..
वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अन
आठवण तरंगते डोळ्याशी.
प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो सुखाला…
जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल..
आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…
आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी
व्यक्ती भेटायला नशीबच लागत… ,
नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत….
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.
खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.
प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
Marathi love quotes for husband | deep love quotes for him | short love quotes for him
तू सांभाळतोस म्हणून पडते मी तू लाड करतोस म्हणून हट्ट करते मी
तू ऐकतोस म्हणून बोलते मी तू समजावतोस म्हणून रुसते मी
तू आहेस म्हणून आहे मी कारण तू तिथे मी…
खूप दिवसांनी आपला माणुस भेटला कि आनंदाला प्रमाण नसतं..
तो मला जपताना, खूप आवडतो..
सांज होईन मी तुझी तू माझं आभाळ होशील का
दुराव्याच हे अंतर मिठीत तुझ्या संपवशील का…
सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणं आहे…
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.
Marathi love quotes for wife | love quotes for her
बायको असावी भांडण करणारी ,
कधी कधी रागाने धुसफूस करणारी,
पण काही झालं तरी हक्काने
फक्त माझ्यासोबत उभी राहणारी
जगासाठी तू एक असशील,
माझ्यासाठी तूच जग आहेस
तुझ्यावर प्रेम करणारे खूप असतील,
पण माझं पाहिलं आणि शेवटच प्रेम तूच आहेस..
तुझं फक्त जवळ असणंही पुरेसं असत मला खुलायला..
मी निरभ्र रात्र होईल तुझ्यासाठी
तू माझा चंद्र होशील का ,
बसलो असता चांदण्या मोजत मी
न सांगताच तू मिठीत घेशील का..
तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल…
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात.
एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय
जरा प्याला निरखून तर बघ,
त्यावर तुझच नाव कोरलय..!
प्रेम केले मनापासुन पण
कधीच तिला ते समजले नाही
सुखी ठेव देवा तु तिला
तिचे दुःख पण मला पाहवत नाही..
स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
तु जर खरंच
माझा Topic असता ना,
तर तुला कधीच Change
केला असता..
पण तु माझी Life आहेस,
And I Can’t
Change My Life ????…
कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस.
अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.
आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.
Self love quotes for girls
Self love quotes for girls : आपण आजपर्यंत नेहमी दुसऱ्यांचाच विचार करत आलो आहोत, स्वतः बद्दल कधी काही वाटलच नाही. आपण स्वतःवर देखील प्रेम केल पाहिजे, आपणच आपल्यासाठी सगळ काही असतो त्यामुळ स्वतःवर जीवापाड प्रेम करा आणि नेहमी खुश राहा. Self love quotes for girls तुम्ही इथून download करू शकता.
मी स्वतंत्र आहे आणि माझे स्वातंत्र्य
माझ्या विचारात ,माझ्या शब्दात, माझ्या वागण्यात आहे..
स्वतःला आनंदी ठेवणे हि आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे..
हो आहे मी एकटी कारण मतलबी लोकांमध्ये,
राहण्यापेक्षा एकट राहिलेलं कधीही चांगल..
ना कुणाच्या अभावाने जगावे ना कुणाच्या
प्रभावाने जगावे आयुष्य
आपले आहे आपल्या धुंदीत जगावे..!
मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही
कारण,
मी असे पुस्तक आहे ज्यात
शब्द कमी आणि भावना जास्त आहेत..
जे लोकं झुकतात ते कमजोर नसतात फक्त त्यांच्या मध्ये
नात टिकवण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते..
दिवा जरी सूर्याची बरोबरी करू
शकत नसला तरी अंधारात,
त्याचे महत्व सूर्य इतकेच आहे त्यामुळे
स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका ..
प्रत्येक मुलीची एका मर्यादेपर्यंत
सहनशीलता असते एखादी,
गोष्ट ऐकून घ्यायची एकदा सहनशीलता संपली
कि ती कोणाचाच विचार करत नाही …
एखाद्या स्वाभिमानी स्त्रीला जीवनात
प्रेम कमी भेटले तर ती समजून घेते,
पण आदर सन्मान भेटला नाहीतर तिच्या मनावर आघात होतो,
मग कितीही प्रयत्न केला तरी ती स्वताच्या
मनापर्यंत त्या व्यक्तिला कधीच पोहचू देत नाही …
आयुष्य आपल आहे म्हणून जगा
नाही तर चावी वर चालणार्या
रोबोट आणि तुमच्या मध्ये
काहीच फरक नाही उरणार…
समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातील
वादळ अधिक भयानक असतात
म्हणून मानातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा,
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल …
Dear girls,
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा नाहीतर
लोकं त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
तुमच्याकडून काम करून घेतील …
Tension घ्यायचं नाही कुणाच वाईट करायचं नाही,
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिनधास्त जगायचं …
गर्दीत हरवण्यापेक्षा एकांतात हरवलेलं बर
कुणी आपला शोध घेवो,
अथवा न घेवो आपण आपल्याला
ओळखणे खूप गरजेचे आहे..
आयुष्यात कधीही कुणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देऊ नका,
कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते …
कुणालाही स्वतः चा अपमान
करण्याची संधी देऊ नका,
जिथे आपल्याला आदर नाही तिथे
थांबू नका मग ते कुणाच घर असो वा हृदय …
मला अभिमान आहे कि मी एक स्री आहे एकटी जरी असले,
तरी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे लाखो बंधने घातली तरी
मी आकाशात माझे स्थान निर्माण करेन …
स्री कधीच हरत नाही समाज काय म्हणेल,
असे म्हणून तिला हरवले जाते…
आपली चूक नसताना केवळ आपल्या स्वभावाचा गैरफायदा
ज्या ठीकाणी घेतला जातो त्या ठिकाणी राहणे चुकीचे आहे कारण ती
माणसे कधीही त्यांचा मतलबी स्वभाव बदलणार नाहीत …
माझ्या आयुष्यात कुणीही खास नाही जे
माझा आदर करतात मी त्यांचाच आदर करते..
आयुष्यात एकमेव सुखी राहण्याचा मार्ग म्हणजे ज्या
गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे…
आयुष्य कुणासाठीही थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची,
कारणे बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत
काही प्रश्न सोडून दिले कि आपोआप सुटतात..
Dear स्री, रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर आरशात बघून स्वताला म्हण
माझ्यासारखी कुणी नाही सावली स्थूल असो वा
ठेंगणी तू सुंदर आहेस ते स्वतःला बजाव…
ना कुणाच्या दबावात जगायचय
ना कुणाच्या प्रभावात जायचय,
लोकांना दुर्लक्ष करून आपल
आयुष्य मजेत जगायचं …
साध सोप्प जगाव दिलखुलास हसावं न लाजता रडावं राग
आला तर चिडाव पण झाल गेल तिथल्या तिथ विसराव..
Sister love quotes
आई नंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहिण. असं म्हणतात कि देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहिण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
आई नंतरची आई म्हणजे ताई…
तोंडावर भांडत असलो ना तरी मनात खूप प्रेम आहे,
आईसारखी माया असलेले ताई हे दुसर रूप आहे…
माझी बहिण लाडाची जणू वटवृक्षाची सावली,
माया, ममतेन भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई…
चंद्रामुळे असतात चांदण्या मस्त चाद्ण्यांमुळे असते,
रात्र मस्त रात्री वरुन असते life मस्त आणि
या जगात माझी बहिण सर्वात जबरदस्त..
तू पाठीसी असताना आभाळ देखील ठेंगण वाटत
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाच भरत येत…
Brother love quotes
प्रत्येक वस्तूवरून माझ्याशी भांडण करणारा, जी वस्तू मला पाहिजे नेमकी तीच वस्तू घेऊन पळणारा, मला नेहमी चिडवणार, मारामारी करणारा, पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं का तेवढच प्रेम ही करणारा मला कधी वेळ झाला कि लगेच फोन वर फोन करणारा,मला सगळ्या गोष्टीत support करणारा, आणि माझे सगळे secrets आई-वडिलांपासून लपवून ठेवणारा आणि त्यावरून पण blackmail करणारा, तू tension घेऊ नको मी आहे ना असं बोलून मला नेहमी धीर देणारा माझा लाडका भाऊ.
भाऊ कसाही असू दे पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो..
कोणी सोबत असो किंवा नसो भाऊ सोबत असला ना तर जग जिंकता येत…
माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे कोण म्हणत,
माझ्या वर कोणीच प्रेम करत नाही
माझ्या भावासारख प्रेम माझ्यावर दुसर कोणीच करत नाही ….
भावाच्या प्रेमात खूप सारे राग मार बोलणे टोकणे
जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते….
आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही कारण
माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे….
कोणी काही पण बोला पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा पहिला हिरो असतो….
फक्त एक भाऊच असतो जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो
आणि आई प्रमाणे काळजी घेऊ शकतो….
माझा भाऊ म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे….
तुझ्या माझ्या नात्यात एक अनामिक ओढ आहे
कारण भाऊ बहिणीच नात खूप गोड आहे…
मुलींच्या आयुष्यात तिच्या वडीलांनंतर तिच्यावर
बापासारख प्रेम करणारा फक्त भाऊच असतो ….
जीवन जगण खूप सोप्प होत जेव्हा भाऊ तू बोलतोस ,
घाबरू नकोस मी आहे ना …
भाऊ तू माझा आधार आहेस, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरचा
प्रवास तुझ्यामुळे सुखकर झाला आणि होत राहिल…