Ashadhi ekadashi 2024 | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

Ashadhi ekadashi 2024

Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी. आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात. एक म्हणजे शुध्द एकादशी आणि विद्य एकादशी. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला पूज्य मानले जाते. या एकादशी निम्मित अनेक वारकरी पंढरपूरची वारी करतात विठ्ठलास भेटावयास जातात. घराघरात या आषाढी एकादशी निमित्त उपवास केला जातो. महाराष्ट्रात च्या काना कोपऱ्यातून विठ्ठल नामाचा गजर करीत एकादशीला पायी दिंडी मध्ये सहभागी होतात. यालाच आषाढी वारी असे म्हणतात. पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं. विठ्ठलाच मनोभावे दर्शन घेतले जाते. या आषाढी निम्मित महाराष्ट्रा सह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात. जस की पैठणहून एकनाथांची पालखी. त्रिंबकेश्र्वरहून निवृत्ती महाराजांची पालखी येते. देहू हून तुकाराम महाराजांची पालखी आळंदी हून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरात येत असते.

आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे.आषाढी एकादशी हा वारकरी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस आहे. मजल-दरमजल करत, विठ्ठलाचे गीत गात, फुगड्या खेळत, रींगण व विविध खेळ खेळत पंढरपूरात दाखल झालेले वारकरी १७ जुलै रोजी विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा दिवस साजरा करणार आहेत. चला तर मग या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊ. Ashadhi ekadashi 2024 (Ashadhi ekadashi 2024 quotes in marathi,ashadi ekadashi 2024 marathi images).

प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत पाळले जाते. या दिवशी दिवसभर उपवासही केला जातो. एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील सर्व पापे नष्ट होतात, असे मानले जाते. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीचे (Devshayani Ekadashi 2024) व्रत विशेष मानले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभ एकादशी, हरिशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) असेही म्हटले जाते. आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी योगनिद्राला म्हणजेच झोपेत जातात आणि नंतर कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशीच्या दिवशी जागे होतात.

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्री मुख आवडीने
आषाढी एकादशीच्या सर्व
वारकरी भक्तांना शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Read More : Ganesh chaturthi wishes in marathi

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

पाणी घालते तुळशीला वंदन करते
देवाला सदा आनंदी ठेव माझ्या
मित्र-मैत्रिणींना हीच प्रार्थना आहे
माझ्या पांडुरंगाला सर्वांना
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

देव दिसे ठाई ठाई भक्तलीन
भक्तापाई सुखालाही आला या
हो आनंदाचा पुर चालला नामाचा
गजर अवघे गर्जे पंढरपूर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024 quotes in marathi | आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीला पंढरपूरासह राज्यभरातील मंदिरं भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. या निमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही विठू नामाचा गजर केला जातो. काही भाविक या निमित्त एक दिवस व्रत पाळतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेषनागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीस पद्मा एकादशी सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा एकमेंकाना दिल्या जातात. हा दिवस वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी अतिशय खास असतो. या दिवशी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल होतात. तेव्हा आषाढी एकादशी या मंगल दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विठूमाऊलीच्या भक्तांना सोशल मीडियाद्वारे खास संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

Ashadhi ekadashi 2024
Ashadhi ekadashi 2024

आषाढी सरसर ओल्या सरी चिंब
भिजती वारकरी जप मुखी पांडुरंग
हरी टाळ चिपळ्यात दंग सारी
विठू माऊलीचा नाद लय भारी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा मेळा जमला
भक्त गणांचा ध्यास विठु माऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

टाळ वाजे मृदुंग वाजे
वाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

विठू दिसतो सावळा
कपाळी चंदनाचा टिळा
आम्हा वारकऱ्यांना लागला
देवा तुझ्या भक्तीचा लळा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे
आणिक काही इच्छा आम्हा
नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंग
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi 2024

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची
कृपा तुम्हा साऱ्यांवर कायम राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Treading

More Posts