Shivaji maharaj ukhane |100+शिवाजी महाराज उखाणे

छत्रपती शिवाजी महाराज उखाणे

Shivaji maharaj ukhane

Shivaji maharaj ukhane : नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे चं नव्हे तर अवघ्या अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची ख्याती फक्त भारतातच नाही तर पूर्ण विश्वामध्ये पसरलेली आहे. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. महाराजांच्या मावळ्यांसाठी खास हे Chhatrapti Shivaji maharaj ukhane आपणांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. (Shivaji maharaj ukhane, shivaji maharaj ukhane in marathi, chhatrapati shivaji maharaj ukhane) खास आपल्या मर्द मराठी मावळे आणि रणरागिणीसाठी लिहीले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द खूप मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 February 1630 साली महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्यावर झाला. संपूर्ण भारतामध्ये 19 फेब्रुवारी ला शिवजयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. शिवजयंतीला देखील Shivaji maharaj ukhane उखाणे खूप मोठ्या प्रमाणात घेतले जातात. इथे Shivaji maharaj ukhane for male आणि Shivaji maharaj ukhane for female दोघांसाठीही Shivaji maharaj ukhane दिलेले आहेत.

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म……… रावांसारखे पती मिळावे 7 जन्म

दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….आणि ……च्या लग्नात आहे……चा

हिंदवी स्वराज स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी,…….. आपण संसाराची सुरवात करूया, सर्वांच्या आशीर्वादांनी

छत्रपती शिवाजी महाराज आहेत, स्वराज्याचा हिरा……….रावांचे नाव घेऊन उखाणा करते पुरा

पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा, अन् ………..घेतोय मी शिवरायांचा मर्द मराठी मावळा

Read More : Dohale ukhane for male

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्तीने,………रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्तीने

रायगडावर शिवाजी महाराजांनी तयार केले राष्ट्र,……….रावांच नाव घेवून मी बोलते जय महाराष्ट्र

किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी,………राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी

जाती भेद नाही केला कधी आमच्या शिवरायांने………च नाव घेवून पाऊल टाकते घरात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने

मराठा आमची जात, भगवे आमचे रक्त…….च नाव घेतो मी शिवरायांचा भक्त

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

भगवा झेंडा आहे आमची शान……नाव घेतो ठेवून सर्वांचा मान

शिवाजी महाराजांनी केली औरंगजेबाची मात ………रावांचे नाव घेऊन, पाऊल टाकते आत

शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान…….रावांचे नाव घेते ताठ ठेऊन मान

शिवाजी महाराज्यांच्या राज्यात सुखी होती प्रजा…………रावांच्या जीवावर करेन मी मजा

धन्य ती जिजाऊ आणि शहाजी राजे ज्यांनी जन्म दिला शिवबाला ………….आले आयुष्यात म्हणून महत्व भेटले जीवनाला

तलवार आणि ढाल आहे शिवबांचे शस्र ……….राव आहेत माझे पती आणि जिवलग मित्र

ताठ होतील माना उंच होतील नजरा …….आणि ………..कडून शिवरायांना मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला, पुस्तके पडतील कमी …………ला आयुष्यभर खुश ठेवण्याची देतो मी हमी

जाती – भेद कधी नव्हता, रयतेच्या राज्यात ……..ला पत्नी बनवून आणली आमच्या समाजात

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

कपाळी लावतो आम्ही भगवा गंध ………आणि ………. ला आहे शिवबांचा छंद

छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत ……..राव माझे सौभाग्य आहेत

प्रत्येक मावळ्यांनी दिली शिवबांना साथ ……..आणि ……….ला सर्वांच्या आशीर्वादाने घ्या घरात

शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती…………आहे माझी सौभाग्याची प्रीती

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे ……..रावांचे नाव घेते ……….घराण्याची शान आहे

शब्द पडतील कमी एवढी महाराजांची कीर्ती आहे ……..रावांसोबत पतीच्या आधी एक प्रेमळ मैत्री आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो ……..ला नेहमी सुखी ठेवण्याचे वचन मी सर्वांसमोर देतो

छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ……….च नाव घेतो सर्वांनी जय महाराष्ट्र माझा म्हणा

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

छत्रपती शिवाजी महाराज आले कि शत्रू जायचे पळून ………चे नाव घेतो जरा बघा मागे वळून

शिवरायांसारखे कार्य, कुणाला नाही जमायचे ………माझे प्रेम तुला नाही कळायचे

शिवबांचे मावळे आम्ही, जन्म आमचा मराठ्यांच्या जातीचा ………. च नाव घेतो अभिमान आम्हाला या मातीचा

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात,………..आम्ही शिवरायांचे मावळे, मनात सर्वांच्या घर करतात

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अमर आहे जगात ………रावांचे नाव घेते ……….च्या घरात

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

धन्य ती माऊली, ज्या बनल्या शिवबांच्या गुरु ……….रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु

जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे शांत बसतात सर्व ……….रावांसारखे पती मिळाले, म्हणून आहे मला गर्व

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे ……..रावांचे नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे

सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये, आजही शिवाजी महाराजांचं नाव घुमतंय………आणि ………ला आशीर्वाद द्यायला, आज सर्व मित्र परिवार जमतय

छत्रपती शिवाजी राजे मिळाले, महाराष्ट्राच्या मातीला………..रावांसारखे प्रेमळ पती, मिळाले आयुष्यभर साथीला

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

शिवाजी महाराजांची होती, सिंहाची चाल आणि गरुडाची नजर………रावांचे नाव घेण्यास, नेहमी मी हजर

रयतेचे राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज एकच…………राव समाजासाठी, नेहमी कार्य करतात नेकच

जरी कापल्या आपल्या नासा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची……….रावांची अशीच साथ असुदे, सात जन्माची

जरी फाडली आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची, पत्नी म्हणून मी नेहमी, सुखा दु:खात साथ देईन………रायांची

शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा इतिहास वाचून बघ……..छाती मानाने फुगते, फक्त एकदा जय शिवराय बोलून बघ

मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली उडी………..रावांच्या नावाने, गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडी

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

छत्रपती शिवाजी महाराज, नेहमी गादीवर बसावे……….रावांचे नाव घेते, तुमचे आशीर्वाद सदैव असावे

शिवरायांनी राज्य केले, शक्ती पेक्षा युक्तीने……….रावांचे नाव घेते, प्रेमभाव भक्तीने

शिवरायांच्या माथेवर, भवानी मातेचा हात………रावांची अशीच असुदे, जन्मभर साथ

मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात, सह्याद्रीच्या रांगा……….रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा

रायगडाच्या सिंहासनावर, छत्रपती शिवाजी राजे………रावांनी येताच, आयुष्य बदलले माझे

Shivaji Maharaj Ukhane
Shivaji Maharaj Ukhane

सह्याद्रीच्या गडावर पडते, छत्रपती शिवाजी महाराजांची सावली………..रावांचे नाव घेते, धन्य ती माऊली

मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही………च नाव घेतो, आयुष्यात कधी तुझी साथ सोडणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आदर्श आहेत……..राव माझे सौभाग्य आहेत

जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे शांत बसतात सर्व………रावांसारखे पती मिळाले, म्हणून आहे मला गर्व

महाराष्ट्रातील खिंड जी, हिंदू भूमीचे द्वार ……….रावांचे नाव घेते, आम्ही शिवरायांचे घरदार

Treading

More Posts