Chanakya niti quotes
Chanakya niti quotes चाणक्य नीतीमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते, जर आपण ते विचार आपल्या जीवनात आत्मसात केले तर त्याच्या विचारांचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य यांचे खूप चांगले विचार आपल्याला प्रेरित करतात.
आचार्य चाणक्य यांचे मूळ नाव विष्णूगुप्ता आणि कौटिल्य असे होते.आचार्य चाणक्य हे महान विद्वान पंडित होते.चाणक्य हे स्वाभिमानी, संयमी आणि तीक्ष्ण बुद्धिमान होते. Chanakya niti किंवा चाणक्य नीती शास्त्र हे आचार्य चाणक्य यांच्या द्वारे रचलेला एक ग्रंथ आहे. Chanakya niti quotes चा वापर करून तुम्ही जीवनातील अनेक संकटांचा सामना करू शकाल आणि यशस्वी होऊ शकता. हे आपण आपल्या दैनंदिन जीवन आत्मसात केले तर तर आपल्यावर आलेल्या संकटांवर मात करण्याची ताकत मिळते.आपली इच्छा शक्ती प्रबळ होते. चा वापर करून आपण आपल ध्येय निश्चित सध्या करू शकतो.
तुम्ही योग्य पेज वर आला आहात. या पेज वर तुम्हाला चाणक्य नीती,तसेच Chanakya niti quotes, success chanakya niti,thought chanakya niti, chanakya niti for motivation तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये पहायला म्हणजे आत्मसात करायला मिळेल.
“कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही.”
-आचार्य चाणक्य
आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा :- 1) आनंदात वचन देवु नका. 2) रागामध्ये उत्तर देवू नका. 3) दु: खामध्ये निर्णय घेवू नका.
-आचार्य चाणक्य
“आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका.”
-आचार्य चाणक्य
अधिक वाचा : चाणक्य नीती
“आपण आनंदात असणे, हेच आपल्या शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते, आणि हीच त्याला सर्वात मोठी शिक्षादेखील असते.”
-आचार्य चाणक्य
“मुर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो.”
-आचार्य चाणक्य
“मत्सर अपयशाचे दुसरे नाव आहे.”
-आचार्य चाणक्य
“अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही, आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही.”
-आचार्य चाणक्य
“सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते.”
-आचार्य चाणक्य
“महिला आणि पैसे दोघेही कधीही फसवणूक करू शकतात, म्हणून या दोघांबद्दल नेहमीच हुशार रहा.”
-आचार्य चाणक्य
“कर्ज, शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका. शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकूही देऊ नका.”
-आचार्य चाणक्य
“जसं भय जवळ येईल हल्ला करा आणि त्याचा नाश करा.”
-आचार्य चाणक्य
“शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते, आणि मुर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे.”
-आचार्य चाणक्य
“क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होत.”
-आचार्य चाणक्य
“जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका, काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल.”
-आचार्य चाणक्य
“कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ. कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे, त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही, तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही.”
-आचार्य चाणक्य
thought chanakya niti :
“एकदा आपण कोणतेही काम सुरु करता तेव्हा त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका किंवा त्याचा विचारही करू नका. जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात, ते सर्वाधिक आनंदी असतात.”
-आचार्य चाणक्य
“तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं, कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता.”
-आचार्य चाणक्य
“बुद्धीमान व्यक्ती तीच आहे, जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, पैशांचा अपव्यय करत नाही, आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतः पुरतीच मर्यादित ठेवते.”
-आचार्य चाणक्य
“एखाद्याकडे शक्ती नसूनही जो मनाने हरत नाही, त्याला हरवण्याची ताकत कोणाकडेच नाही.”
-आचार्य चाणक्य
“मृत्यू कधीही झोपत नाही, तो नेहमी जागृत असतो, म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका.”
-आचार्य चाणक्य
“व्यक्तीच्या मनात नेमके काय चालले आहे? हे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते.”
-आचार्य चाणक्य
“एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे.”
-आचार्य चाणक्य
“बुद्धिमान व्यक्तीचा कोणीही शत्रू नसतो.”
-आचार्य चाणक्य
“इतरांसमोर वाका पण तितकंच जेवढं योग्य आहे, नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल.”
-आचार्य चाणक्य
“मुर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करणे.”
-आचार्य चाणक्य
“प्रत्येक मैत्रीमागे स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो. स्वार्थाशिवाय मैत्री नसते. हे जीवनातील एक कटू सत्य आहे.”
-आचार्य चाणक्य
“संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परीक्षा होत असते, आणि तिच आपल्या कामाला येते.”
-आचार्य चाणक्य
“साप विषारी नसेल तरी जगण्यासाठी त्याला फुस्स करावंच लागतं.”
-आचार्य चाणक्य
“ज्याठिकाणी तुमचा सन्मान होत नाही, त्याठिकाणी एक क्षणभर देखील थांबू नका.”
-आचार्य चाणक्य
“तुमच्या शब्दांची ताकद कधीच तुमच्या आईवडिलांवर वापरू नका, विसरू नका… त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे.”
-आचार्य चाणक्य
“बरेच गुण असूनही, फक्त एक दुर्गुण सर्व काही नष्ट करू शकतो.”
-आचार्य चाणक्य
“दुसऱ्याजवळ असणाऱ्या धनाचा लोभ ठेवणे हेच आपल्या अधोगतीचे कारण असते.”
-आचार्य चाणक्य
“भाग्यपण त्यांनाच साथ देते, ज्यांनी कठीण काळातही स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही.”
-आचार्य चाणक्य
“मजबूत मनाला हरवण्याची ताकत कोणातच नाही.”
-आचार्य चाणक्य
“तुम्हाला जे करायचे आहे, ते जोरदारपणे करा, आणि मनापासून करा. हि गोष्ट सिंहापासून शिका.”
-आचार्य चाणक्य
“ज्याच्यावर तुमचे प्रेम असते तुम्हाला त्याचीच भीती वाटते, कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे.”
-आचार्य चाणक्य
“फुलाचा सुगंध फक्त वातावरणात पसरतो, पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात.”
-आचार्य चाणक्य
“आळशी लोकांना ना वर्तमान असतो, ना भविष्य…”
-आचार्य चाणक्य
“तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका, की कोणीही तुमच्या जीवनाचा खेळ करेल.”
-आचार्य चाणक्य
“तुम्ही बोलत असताना जो इकडे-तिकडे पाहतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका.”
-आचार्य चाणक्य
“नशीबसुद्धा बहादूर लोकांचीच साथ देते.”
-आचार्य चाणक्य
“जेव्हा भिती तुमच्यावर आक्रमण करेल, तेव्हा तुम्हीही त्याच्यावर तुटून पडा व त्याचा नाश करा.”
-आचार्य चाणक्य
“आपल्यातील कमतरता कधीही इतरांना सांगू नका, ते तुमच्यासाठी घातक सिध्द ठरू शकते.”
-आचार्य चाणक्य
“सामर्थ्यवान शत्रू आणि कमकुवत मित्र नेहमी हानीच करतात.”
-आचार्य चाणक्य
“कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो.”
-आचार्य चाणक्य
“नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्याची संधी देत असते.”
-आचार्य चाणक्य
“एखाद्या व्यक्तीमध्ये एकजरी चांगला गुण असेल तरी त्याचे सर्व वाईट गुण झाकले जातात.”
-आचार्य चाणक्य
“प्रेमसंबंध, तुमचे उत्पन्न आणि तुमची पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा.”
-आचार्य चाणक्य
“ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे कारण शिक्षणापुढे तारूण्य आणि सौंदर्य दोन्ही कमजोर आहेत.”
-आचार्य चाणक्य
“भूतकाळात जे घडले, त्यामुळे दुःखी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे.”
-आचार्य चाणक्य
“वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा, मजा तर तेव्हा येते, जेव्हा संपत्ती तुमची असते, पण गर्व वडिलांना होतो.”
-आचार्य चाणक्य
“कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती आणि चिंतेचा सामना करावा लागतो, कारण सर्व दुःखाचे मुळ प्रेम आहे.”
-आचार्य चाणक्य
“बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो, त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका.”
-आचार्य चाणक्य
“प्रेम काय आहे, एक अशी नैतिक मादकता ज्यात डुंबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते. कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती महत्त्वाची असते, जिच्यावर तुमचे प्रेम असते.”
-आचार्य चाणक्य
“जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्यास सुरुवात केली, तर तोही एक दिवस कंगाल बनेल.”
-आचार्य चाणक्य
“संसारात सर्वात मजबूत बंधन प्रेमाचे असते, कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा करू शकतो. पण तो कोमल कमळाच्या फुलातून, जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही.”
-आचार्य चाणक्य
“एका राजाची ताकत त्याच्या शक्तीशाली हातात असते, विद्वानाची ताकत त्याच्या ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकत तिच्या सौंदर्य, तारूण्य आणि मधुर वाणीत असते.”
-आचार्य चाणक्य
“भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका, कारण चिंता आणि बैचेनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे.”
-आचार्य चाणक्य
“जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही, त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही.”
-आचार्य चाणक्य
“शब्द हे पण भोजन आहे, प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते, बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पाहा, जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका.”
-आचार्य चाणक्य
“मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते.”
-आचार्य चाणक्य
“निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही अजून एक नवीन शत्रू बनवता.”
-आचार्य चाणक्य
“कोणतीही व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक इमानदार आणि सरळ स्वभावाची असता कामा नये, कारण, जंगलातील सरळ वृक्ष आणि समाजातील सरळ व्यक्ती सर्वात अगोदर कापल्या जातात.”
-आचार्य चाणक्य
“शिक्षण एक चांगला मित्र आहे. ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान, आदर मिळतो. तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे.”
-आचार्य चाणक्य
“माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे, पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे.”
-आचार्य चाणक्य
“कोणतेही काम सुरु करण्याच्या अगोदर स्वतः ला नेहमी खालील 3 प्रश्न विचारा… 1) मी हे का करत आहे? 2) याचा काय परिणाम होऊ शकतो? 3) मी या कामामध्ये यशस्वी होईल का? जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमच्या जिंकण्याची शक्यता देखील कैकपटींनी वाढते.”
-आचार्य चाणक्य